मुंबई - गोरेगाव पश्चिम द्रुतगती महामार्गावर पेट्रोल टँकरच्या केबिनमध्ये आग लागल्याची घटना आज सकाळी घडली. सुदैवाने वेळीच अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली.
पश्चिम द्रुतगती महामार्गावर पेट्रोल टँकरला आग; तासभर वाहतूक प्रभावित - shahabaz shaikh
गोरेगाव पश्चिम द्रुतगती महामार्गावर पेट्रोल टँकरच्या केबिनमध्ये आग लागल्याची घटना आज सकाळी घडली.
पेटलेला टँकर
हा टँकर गोरेगाव पूर्वेकडून अंधेरीच्या दिशेला जात होता. त्यावेळी अचानक केबिनमध्ये आग लागली. वेळीच प्रसंगावधान राखत चालकाने बाहेर उडी घेतली त्यामुळे जीवितहानी टळली. मात्र, या घटनेमुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावरील दक्षिणेकडील वाहतूक तासभर प्रभावित झाली होती. सध्या वाहतूक सुरळीत आहे.