मुंबई -नरिमन पॉईंट येथील जॉली मेकर चेंबर 2 इमारती मधील बँक ऑफ बहरिन अँड कुवैतच्या सर्व्हर रूमला पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास आग लागली होती. या आगीवर सकाळी 7 वाजता अग्निशमन विभागाने नियंत्रण मिळवले आहे.
इमारतीच्या तळमजल्यात ही बँक आहे. जॉली मेकर चेंबर 2 ही इमारत तळमजल्यासह 14 मजल्याची आहे. या आगीत बँकेतील फर्निचर, संगणक, यूपीएस बॅटरी, विद्यूत तारा, महत्वाची कागदपत्र जळून खाक झाली आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नसल्याची माहिती अग्निशमन विभागाकडून देण्यात आली.