मुंबई : गेल्या वर्षी करीरोड येथील अविघ्न पार्क या इमारतीला आग ( Avighna Park building caught fire ) लागली होती. या इमारतीला पुन्हा एकदा आग लागल्याचे समोर आले आहे. दरम्यान या ठिकाणी मुंबई अग्निशमन दल कॉल येताच दाखल झाले. मात्र येथील सुरक्षा आणि इतर यंत्रणांना आगीपासून कसा बचाव करायचा याची माहिती नाही. येथील यंत्रणा कुचकामी असल्याचा आरोप ( Allegation that the system is ineffective ) मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर ( Former Mayor Kishori Pednekar ) यांनी केला आहे.
प्रशिक्षित कर्मचारी असायला हवेत :करीरोड येथील महादेव पालव मार्ग, भारत माता सिनेमा समोरील उत्तुंग अशा अविघ्न पार्क या इमारती मधील एका घरामध्ये आग लागली आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पालिका कर्मचारी त्वरित दाखल होतात. अग्निशमन दलाचे जवान आपल्या जीवावर खेळून आग विझवतात. त्यांना दोष देणे योग्य नाही. इमारतीमध्ये चांगली वायरिंग, उपकरणे आणि प्रशिक्षित कर्मचारी असणे गरजेचे आहे. या इमारतीत चांगले वायरिंग आणि प्रशिक्षित कर्मचारी असायला हवेत अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली.