मुंबई : Mumbai Building Fire : कांदिवली पश्चिमेतील महावीर नगर येथील पवनधाम वीणा संतूर इमारतीला सोमवारी दुपारी भीषण आग लागली होती. या आगीत 2 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून, 3 जण जखमी झाले आहेत. याबाबतची अधिकृत माहिती मुंबई महानगरपालिकेनं दिली.
Mumbai Building Fire : कांदिवलीमधील पवनधाम वीणा संतूर इमारतीला आग; दोघांचा मृत्यू - पवनधाम वीणा संतूर इमारतीला आग
Mumbai Building Fire : कांदिवली पश्चिमेतील महावीर नगर येथील पवनधाम वीणा संतूर इमारतीला लागलेल्या आगीत 2 जणांचा मृत्यू झाला असून, 3 जण जखमी झाले आहेत. ही आग सोमवारी (23 ऑक्टोब) दुपारच्या सुमारास लागली होती.

Published : Oct 23, 2023, 3:06 PM IST
|Updated : Oct 23, 2023, 3:25 PM IST
आगीवर नियंत्रण :मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, कांदिवली पश्चिमेतील महावीर नगर येथे पवनधाम वीणा संतूर ही इमारत आहे. सोमवारी दुपारी या इमारतीत भीषण आग लागली होती. याबाबतची माहिती मुंबई पालिकेच्या अग्निशामन दलाच्या कंट्रोल रुमला मिळाली होती. त्यानंतर लगेच अग्निशामन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले होते. आठ अग्निशामन दलाच्या गाड्यांच्या माध्यमातून या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.
दोघांचा होरपळून मृत्यू :सुरुवातीला या आगीनं रौद्ररुप धारण केलं होतं. या आगीत होरपळून दोघांचा मृत्यू झाला असून, अन्य तिघे गंभीर जखमी आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आग लागल्यानंतर या इमारतीमधून अनेक रहिवाशांचा सुखरुप बाहेर काढण्यात आलं. सध्या येथे कुलिंगचं काम सुरू आहे.