मुंबई - चर्चगेट येथील मेकर चेंबर या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आज (बुधवार) सकाळी आग लागली. आगीची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी अथवा जखमी झाल्याचे वृत्त नाही.
दक्षिण मुंबईत विठ्ठल दास ठाकरे रोड, ग्रॅनाईट बिल्डिंगच्या बाजूला, फोर्ट मुंबई येथे मेकर भवन इमारत आहे. ही इमारत व्यावसायिक कार्यालय असलेली इमारत आहे. इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणात कार्यालये आहेत. या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आज सकाळी साडे-सातच्या सुमारास आग लागली.
तेव्हा घटनास्थळी मुंबई अग्निनिशमन दलाचे ५ फायर वाहन, ५ जम्बो वॉटर टँकर, १ रेसक्यू वाहन, १ बी.ए.वाहन आणि १ टी.टी.एल. वाहन दाखल झाले आणि त्यांनी आगीवर त्वरित नियंत्रण मिळवले. सकाळची वेळ असल्याने इमारतीत कोणीही नव्हते. त्यामुळे सुदैवाने आगीत कोणतीही जीवीतहानी अथवा जखमी झालेले नाही. पण आगीमध्ये कार्यालयामधील सामान जळाले असल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली आहे. दरम्यान, आगीचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही.
हेही वाचा -अन्यायकारकरित्या वीज जोडणी कापली जाणार नाही, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊतांची ग्वाही
हेही वाचा -पालिका रुग्णालयांना ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा उशिरा ; पुरवठादाराला ठोठावला 10 लाखांचा दंड