महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Fire in Kandivali : कांदिवली येथील आगीत २७ जणांना धुराची बाधा, १३ जण गंभीर - कांदिवली आग दुर्घटना 28 डिसेंबर 2021

कांदिवली पश्चिम येथे छत्रपती शिवाजी महाराज संकुल म्हाडा वसाहत येथील तळापासून ८ मजली असलेल्या १० नंबरच्या बिल्डिंगमधील जीर्ण अवस्थेतील इलेक्ट्रिक मीटर बॉक्समध्ये मंगळवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास शॉर्टसर्किट होऊन केबल वायरला आग लागली. ( Fire Broke Out in Kandivali on Tuesday )

Fire broke out in Kandivali
कांदिवली आग

By

Published : Dec 29, 2021, 1:04 AM IST

मुंबई -कांदिवली येथील म्हाडाच्या इमारतीला मंगळवारी सकाळी आग लागली. या आगीच्या धुरामुळे या इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांनी गच्चीवर आसरा घेतला. मात्र, आगीच्या धुरामुळे या रहिवासी जखमी झाले आहेत. अग्निशमन दलाने इमारतीच्या गच्चीवरून ५० ते ६० रहिवाशांची सुखरूप सुटका केली. त्यापैकी २२ जण रूग्णालयात उपचार घेत असून त्यामधील १३ जणांची प्रकृती गंभीर आहे. ( Fire Broke Out in Kandivali on Tuesday )

५० ते ६० जणांची सुटका -

मिळालेल्या माहितीनुसार, कांदिवली पश्चिम येथे छत्रपती शिवाजी महाराज संकुल म्हाडा वसाहत येथील तळापासून ८ मजली असलेल्या १० नंबरच्या बिल्डिंगमधील जीर्ण अवस्थेतील इलेक्ट्रिक मीटर बॉक्समध्ये मंगळवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास शॉर्टसर्किट होऊन केबल वायरला आग लागली. त्यामुळे इमारतीत मोठ्या प्रमाणात धूर पसरला. या आगीच्या घटनेची माहिती मिळताच, इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांमध्ये खळबळ माजली. अनेकजण भयभीत झाले. अनेकांनी जिवाच्या भीतीने इमारतीबाहेर सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. तर लहान मुले, महिलांसह ५० ते ६० जण इमारतीमध्येच विविध मजल्यांवर अडकून पडले.

याबाबतची माहिती स्थानिक नागरिक, शिवसैनिकांना मिळताच तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन अग्निशमन दल मदतीला पोहोचण्यापूर्वीच बचावकार्याला सुरुवात केली. अग्निशमन दलाचे जवान दाखल होताच त्यांनी इमारतीच्या गच्चीवर अडकून पडलेल्या ५० ते ६० रहिवाशांची सुखरूप सुटका केली.

हेही वाचा -five children death in Cylinder Blast : गॅस सिलिंडरच्या स्फोटात पाच जणांचा मृत्यू; बिहारमधील दुर्घटना

२७ जणांवर रुग्णालयात उपचार -

इमारतीच्या गच्चीवरून सुटका केलेले रहिवासी धुरामुळे घुसमटले होते. त्यापैकी २७ जणांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. २२ जणांना नजीकच्या जुन्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी गंभीर ९ जणांवर 'आयसीयू'त उपचार सुरू आहेत. तर इतर ५ जणांना 'ऑस्कर' या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यापैकी गंभीर ४ जणांवर 'आयसीयू'त उपचार सुरू आहेत, अशी माहिती शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविका गीता भंडारी यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details