मुंबई -पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीत 5 जणांचा मृत्य झाला असून ही घटना दुर्दैवी असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. मात्र, सीरम इन्स्टिट्यूटमध्ये लागलेल्या आगीत कोव्हिडशिल्ड लसीचे नुकसान झाले नसल्याची माहितीही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. सीरम इन्स्टिट्यूटला एसईझेड थ्री या इमारतीला आग लागली असून या इमारतीत वेल्डिंगचे काम सुरू होते. वेल्डिंग करतेवेळी निघालेल्या स्पार्कमुळे जवळच असलेल्या ज्वलनशील पदार्थाने पेट घेतल्याने ही आग लागली असल्याची प्राथमिक माहिती राजेश टोपे यांनी माध्यमांना दिली.
तीन तासांत अग्निशमन दलाने आगीवर मिळवले नियंत्रण -