महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

करण जोहर यांच्या गोरेगावमधील धर्मा प्रॉडक्शनच्या गोदामाला मध्यरात्री भीषण आग, साहित्य जळून खाक - goregaon

आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या १२ गाड्या आणि ८ वॉटर टँकर घटनास्थळी दाखल होत्या. या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनच्या गोदामाला आग, साहित्य जळून खाक

By

Published : Apr 30, 2019, 10:53 AM IST

Updated : Apr 30, 2019, 11:14 AM IST

मुंबई -गोरेगाव येथील करण जोहर यांच्या धर्मा प्रोडक्शनच्या गोदामाला सोमवारी मध्यरात्री २.३० वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. हे गोदाम कामा इंडस्ट्री परिसरात आहे. अग्निशमन दलाच्या ५ तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश आले.

करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनच्या गोदामाला आग, साहित्य जळून खाक

आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या १२ गाड्या आणि ८ वॉटर टँकर घटनास्थळी दाखल होत्या. या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

धर्मा प्रॉडक्शन हे हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहर यांच्या मालकीचे आहे. आग लागलेल्या गोदामात शूटिंगसंबंधित साहित्य असावे, असा अंदाज वर्तवला जात आहे. आगामुळे यातील महत्त्वाचे साहित्य जळून खाक झाले आहे. यामुळे धर्मा प्रॉडक्शनचे मोठे नुकसानही झाल्याची माहिती समोर येत आहे.

Last Updated : Apr 30, 2019, 11:14 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details