महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दादरमधील रणजीत स्टुडिओजवळील मार्केटला आग.. कपड्याचे दुकान जळून खाक - dadar cloth shop fire

जीएसटी भवन येथील आगीचे प्रकरण ताजे असतानाच आज सकाळी साडे पाचच्या सुमारास दादर येथील चित्रा थिएटरच्या जवळ असलेल्या रणजित स्टुडिओ जवळील एका कपड्याच्या दुकानाला आग लागल्याची घटना घडली आहे.

dadar cloth shop fire
दादर येथील आगीमध्ये कपड्याचे दुकान जळून खाक

By

Published : Feb 21, 2020, 12:46 PM IST

मुंबई -मुंबईमधील आगीचे सत्र अद्यापही सुरुच आहे. जीएसटी येथील आगीची घटना ताजी असतानाच, आज सकाळी दादर येथील कपड्याच्या दुकानाला आग लागल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान या आगीत कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली आहे.

दादर येथील आगीमध्ये कपड्याचे दुकान जळून खाक

हेही वाचा -

अंधेरी रेल्वे स्थानकातील सरकता जिना दुर्घटना; रेल यात्री परिषदेची कारवाईची मागणी

जीएसटी भवन येथील आगीचे प्रकरण ताजे असतानाच आज सकाळी साडे पाचच्या सुमारास दादर येथील चित्रा थिएटरच्या जवळ असलेल्या रणजित स्टुडिओ जवळील एका कपड्याच्या दुकानाला आग लागली. 5 वाजून 47 मिनिटांनी आगीची लेव्हल 2 झाली. घटनास्थळी पोहचलेल्या अग्निशमन दलाने आग विझवली असून, त्यात कोणीही जखमी झालेले नाही. अशी माहिती मिळत आहे.

हेही वाचा -

अखेर महापोर्टल बंद; ठाकरे सरकारच्या निर्णयाने फडणवीसांना दणका

ABOUT THE AUTHOR

...view details