मुंबई- येथील नागपाडा जंक्शन परिसरातील जेडी टॉवर मोहल्लामध्ये एका इमारतीला आग लागली होती. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग प्रथम मोठी होती परंतु, अग्निशमनच्या गाड्या वेळीच आल्या आणि आग विझवली. आग 'लो लेव्हल'ची होती अशी माहिती पालिका अधिकारी कार्यालयाने दिली आहे.
नागपाडा येथील जेडी इमारतीला आग; कोणतीही जीवितहानी नाही - नागपाडा येथील जेडी इमारतीला आग
नागपाडा जंक्शन परिसरातील जेडी टॉवर मोहल्लामध्ये एका इमारतीला आग लागली होती. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग प्रथम मोठी होती परंतु, अग्निशमनच्या गाड्या वेळीच आल्या आणि आग विझवली.
आग साधारण साडे तीनच्या सुमारास लागली होती. या आगीतून मोठ्या प्रमाणात धूर येत होता. त्यामुळे लोकांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली होती. या आगीत सुरुवातीला कोणी अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. मात्र, त्यात कोणीही अडकले नव्हते. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी पोहचल्या. आग धुरामुळे सुरुवातीला मोठी वाटत होती. आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न केले. अथक प्रयत्नांनी आग विजवली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. यात कोणतीही जिवीतहानी नाही. मात्र, इमारतीच मोठे नुकसान झाले आहे.