मुंबई: भायखळा मुस्तफा बाग परिसरातील ग्लोरिया कॉन्व्हेंट स्कुल जवळील एका लाकडाच्या गोदामाला पहाटे ६ च्या सुमारास आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल, स्थानिक पोलीस, पालिका आणि बेस्ट कर्मचारी घटनास्थळी पोहचले आहेत.
Fire At Bhaykhala : भायखळा येथील लाकडाच्या गोदामाला आग - undefined
भायखळा मुस्तफाबाग परिसरातील ग्लोरिया कॉन्व्हेंट स्कुल जवळच असलेल्या एका लाकडाच्या गोदामाला सकाळी ६च्या सुमारास आग लागली. अग्निशमन दलाच्या 8 गाड्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.
लाकडाच्या गोदामाला आग
आग लागलेल्या गोदामाच्या बाजूला दाटीवातीचा परिसर असल्याने आग पसरुनये यासाठी विशेष काळजी घेण्यात येत होती. आगीमुळे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणिही जखमी झालेले नाही. आग विझवण्याचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली.
Last Updated : Jan 10, 2022, 9:18 AM IST
TAGGED:
Fire At Bhaykhala