मुंबई :नागपूर पोलीस नियंत्रण कक्षाला काल एका अज्ञात कॉलरने फोन करून मुकेश अंबानी, अमिताभ आणि धर्मेंद्र यांच्या घरी बॉम्बस्फोट होणार असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी संबंधित ठिकाणी सुरक्षा वाढवली. दादर मुंबई येथे 25 शस्त्रधारी लोक आले आहेत. ते दहशतवादी घटना घडवून आणणार आहे, अशी अज्ञात व्यक्तीने नागपूर पोलीस नियंत्रण कक्षास फोनवर माहिती दिली. दादरमधील शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात या पार्श्वभूमीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, या प्रकरणी भारतीय दंड संविधान कलम ५०५(१), ५०६(२) १८२ अन्वये एफआयआर नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी कॉल करणाऱ्याचा शोध घेतला जात आहे.
काल आला होता कॉल :नागपूर पोलीस नियंत्रणाला मुंबईतील प्रतिष्ठित लोकांच्या घरी बॉम्बस्फोट करणार असल्याचा फोन अज्ञात व्यक्तीकडून प्राप्त झाला. त्यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाल्याचे दिसून येत आहे. तसेच अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या घरी आणि बॉलीवूड अभिनेता धर्मेंद्र यांच्या घरीही बॉम्बस्फोट होणार असल्याचे कॉलरने सांगितले. मुंबई पोलिसांनी या फोनबाबत माहिती मिळताच कॉल करणाऱ्या कॉलरचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. अमिताभ बच्चन, धर्मेंद्र आणि मुकेश अंबानी ही मुंबईतील प्रतिष्ठित आणि प्रसिद्ध असे व्यक्ती आहेत. त्या अनुषंगाने कॉलरला शोधण्यासाठी मुंबई पोलीस आणि इतर तपास यंत्रणा शर्तीचे प्रयत्न करत आहेत. मुंबई पोलिसांना अज्ञात कॉलरच्या फोन कॉलनंतर नागपूर पोलीस नियंत्रण कक्षाने ही माहिती दिली. त्यांनतर मुंबई पोलिसांनी तपासाचे चक्रे वेगाने फिरवली. तातडीने कॉलरचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.