महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sachin Tendulkar : वैद्यकीय उत्पादनाच्या जाहिरातीत अवैधपणे वापरले सचिन तेंडुलकरचे नाव, गुन्हा दाखल - सचिन तेंडुलकरच्या नावाचा उपयोग

वैद्यकीय उत्पादनांची जाहिरात करण्यासाठी सचिन तेंडुलकरच्या नावाचा उपयोग करण्यात आला. त्यामुळे सचिनच्या वतीने त्याच्या सहायकाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Sachin Tendulkar
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर

By

Published : May 13, 2023, 11:50 AM IST

Updated : May 13, 2023, 1:00 PM IST

मुंबई :विश्व विख्यात क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्याविषयी धक्कादायक घटना उघड झाली आहे. सचिनच्या परवानगीशिवाय त्याचे नाव, फोटो आणि आवाजाचा वापर करून वैद्यकीय उत्पादनांचा प्रचार करण्याचा प्रकार समोर आला. यानंतर मुंबई पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध पश्चिम क्षेत्र सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी शुक्रवारी दिली आहे.

औषधी उत्पादनांच्या जाहिरातीत वापरले नाव :मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या परवानगीशिवाय औषधी उत्पादनांच्या जाहिरातीसाठी त्याचे नाव, फोटो आणि आवाज वापरला आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सचिनच्या सहायकाने गुरुवारी पश्चिम विभाग सायबर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी ही कारवाई केली आहे. सचिन तेंडुलकरच्या सहायकाने गुरुवारी पश्चिम क्षेत्र सायबर पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दाखल केली होती, असे त्यांनी सांगितले. या तक्रारीमध्ये एका औषध कंपनीच्या ऑनलाईन जाहिराती दिसल्या. या जाहिरातीत सचिनने त्यांच्या उत्पादनाला मान्यता दिल्याचा दावा करण्यात आला होता.

सचिनचा फोटो वापरून केली जाहिरात :मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा फोटो वापरुन जाहिरात बनवल्याचे उघड झाले आहे. ही जाहिरात बनवणाऱ्या आरोपीने sachinhealth.in ही वेबसाइटही बनवल्याचे उघड झाले. यामध्ये सचिनचा फोटो वापरून या उत्पादनांची जाहिरात करण्यात आली आहे. सचिन तेंडुलकरने कंपनीला त्याचे नाव आणि फोटो वापरण्याची परवानगी दिली नव्हती. त्यामुळे त्याची प्रतिमा मलीन होत असल्यामुळे त्याने त्याच्या सहायकाला कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल :सचिन तेंडुलकर हा जगप्रसिद्ध खेळाडू असल्याने त्यांचे जगभरात चाहते आहेत. मात्र सचिनच्या नावाने बनावट वेबसाईट काढून औषधी उत्पादनाच्या जाहिरातीत त्याचा फोटो आणि नाव छापले आहे. त्यामुळे सचिनच्या प्रतिमेला तडा गेला आहे. सचिन तेंडुलकरने कंपनीला त्याचे नाव आणि छायाचित्रे वापरण्याची परवानगी दिलेली नाही. तसेच, या जाहिरातीमुळे प्रतिमा खराब होत असल्याने सचिनने त्याच्या सहायकाला कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार पोलिसांनी फसवणूकीच्या भादंवि कलमांसह माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलमांन्वये अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा -

  1. Journalist CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले आता पत्रकार; वाचा, कसे?
  2. Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षाची न्यायालयीन लढाई, शिवसेना नावासह धनुष्यबाण चिन्हावर अजूनही वाद
  3. Devendra Fadnavis on Sharad Pawar : 'शरद पवार आणि नैतिकतेचा काही संबंध आहे का?'
Last Updated : May 13, 2023, 1:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details