महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भटक्या श्वानाला मारहाण करणाऱ्या सुरक्षारक्षकावर पवईत गुन्हा दाखल - श्वान

भटक्या श्वानाला सुरक्षारक्षकाने अमानुषपणे मारहाण करत असतानाचा एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याप्रकरणी प्राणीमित्राच्या तक्रारीवरून पवई पोलिसांनी अनोळखी सुरक्षारक्षकावर गुन्हा दाखल केला आहे.

पवई

By

Published : Aug 26, 2019, 10:34 AM IST

मुंबई- पवईत एका भटक्या श्वानाला सुरक्षारक्षकाने अमानुषपणे मारहाण करत असतानाचा एक व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याप्रकरणी प्राणीमित्राच्या तक्रारीवरून पवई पोलिसांनी अनोळखी सुरक्षारक्षकावर गुन्हा दाखल केला आहे.

भटक्या श्वानाला मारहाण करणाऱ्या सुरक्षारक्षकावर पवईत गुन्हा दाखल

ही घटना पवईतील एलअँडटी इमरेल्ड इसली या इमारतीत 18 जुलै 2019 च्या पहाटे 3 वाजताची आहे. एका भटक्या श्वानाला सुरक्षारक्षक काठीने मारहाण करत असताना श्वान मोठमोठ्याने किंचाळत आहे. हा व्हिडीओ एका स्थानिक नागरिकाने काढून तो सोशल मीडियावर व्हायरल करत पवई एलअँडटी इमरेल्ड इमारत असे कॅप्शन टाकले होते.

यासंदर्भात प्राणीमित्र पॉज संस्था मुंबई सचिव सुनिश सुब्रमण्यम कुंजू म्हणाले, की श्वानाला मारहाण करतानाचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याबाबत आम्ही खात्री करून माहिती मिळवली असता, ही घटना पवईत घडली आहे. सोसायटीतील काही सदस्यांच्या सूचनेवरून सुरक्षारक्षकाने 'फिली'नावाच्या एका भटक्या श्वानाला बेदम मारहाण केली. मारहाण करण्याचे कारण काय तर त्या प्राण्याने पार्किंगमध्ये आश्रय घेतला होता. याप्रकरणी गुरुवारी कुंजू यांच्यातर्फे पवई पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देण्यात आल्यानंतर पवई पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कुंजू यांनी घटनास्थळाला भेट दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details