मुंबई -शहरामध्ये एक वर्ष झाले तरी कोरोनाचा प्रसार कमी होताना दिसत नाही. त्यासाठी पालिकेने कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी केअरण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्या गोहर खान या अभिनेत्रीने कोरोना नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या या अभिनेत्रीने खोटा कोरोना रिपोर्ट बनवला तसेच त्याद्वारे लोकांमध्ये फिरल्याने कोरोना नियमांची पायमल्ली केल्याचा आरोप गोहर खानवर ठेवण्यात आला आहे.
अभिनेत्री विरोधात एफआयआर
अभिनेत्री गोहर खान ओशिवरा विभागात राहते. तिच्याकडे 11 तारखेला ती पॉझिटिव्ह असल्याचा तर 12 तारखेला दिल्लीचा निगेटिव्ह असल्याचे रिपोर्ट आढळून आले आहेत. गोहर खान पॉझिटिव्ह असताना ती लोकांमध्ये मिसळत असल्याचा तसेच शूटिंग करत असल्याचा प्रकार समोर आला. तिची चौकशी केली असता ती दिल्लीचा खोटा रिपोर्ट घेऊन बाहेर फिरत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी गोहर खानवर ओशिवरा पोलीस ठाण्यात साथ नियंत्रण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.