मुंबई - काळबादेवी परिसरात तब्बल ७३ कोटी रुपयांचे पाणी चोरीला गेले आहे. याप्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी ६ जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. भूगर्भातील पाणी चोरी प्रकरणी हा मुंबईतील पहिला गुन्हा असल्याचे सांगितले जात आहे.
मुंबईत तब्बल ७३ कोटींच्या भूगर्भातील पाण्याची चोरी, ६ जणांविरोधात गुन्हा दाखल - भूगर्भातील पाणी चोरी
मुंबईतील काळबादेवी परिसरात गेल्या ११ वर्षांपासून भूगर्भातील पाण्याची चोरी सुरू होती. त्यामुळे ६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पांड्या मेंशन या इमारतीचा मालक त्रिपुरादास पांड्या, प्रकाश पांड्या , मनोज पांड्या, अरुण मिश्रा, श्रावण मिश्रा, धीरज मिश्रा, असे आरोपींचे नावे आहेत. गेल्या ११ वर्षांपासून हा पाणीचोरीचा धंदा चालू आहे. त्यामुळे सुरेशकुमार धोका यांनी तक्रार केली आहे. त्यानुसार पांड्या मेंशन इमारतीच्या आवारामध्ये तिनही पांड्या यांनी अधिकृतरित्या २ विहिरी खोदल्या होत्या. त्यानंतर या विहिरीमध्ये अनधिकृत वीज जोडणी घेतली. त्यामधून टँकर माफिया म्हणून ओळखले जाणारे तिन्ही मिश्रा यांच्यासोबत मिळून गेल्या २००६ ते २०१७ या काळात तब्बल ६ लाख टँकर पाणी उपसण्यात आले. त्याची किंमत जवळपास ७३ कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.