महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लॉकडाऊनच्या काळात सोशल मीडियाचा गैरवापर करणाऱ्या 177 जणांवर गुन्हे दाखल - मुंबई कोरोना इफेक्ट

सायबर पोलिसांच्या तपासानुसार गेल्या आठवडाभर राज्यात सोशल माध्यमावर समाजकंटकांकडून जातीय तेढ निर्माण करणारे मेसेज मोठ्या प्रमाणावर व्हायरल केले जात आहेत. अशा 88 प्रकरणात पोलिसांनी कारवाई केली.

fir file against 177 accused in cyber crime
लॉकडाऊन काळात सोशल माध्यमांचा गैरवापर करणाऱ्या 177 जणांवर गुन्हे दाखल

By

Published : Apr 12, 2020, 6:29 PM IST

मुंबई - महाराष्ट्र सायबर पोलीस विभागाकडून लॉकडाऊन काळात राज्यभरात फेक न्यूज, अफवा आणि जातीय तेढ निर्माण करणाऱ्या संभाषणाचा प्रसार केल्याप्रकरणी 177 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आतापर्यंत 177 गुन्ह्यांपैकी 32 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच 108 आरोपींची सायबर पोलिसांनी ओळख केली असून, राज्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यातून लवकरच फरार आरोपींचा शोध घेऊन अटक केली जाणार आहे.

सायबर पोलिसांच्या तपासानुसार गेल्या आठवडाभर राज्यात सोशल माध्यमावर समाजकंटकांकडून जातीय तेढ निर्माण करणारे मेसेज मोठ्या प्रमाणावर व्हायरल केले जात आहेत. अशा 88 प्रकरणात पोलिसांनी कारवाई केली असून, गेल्या 24 तासात 5 आरोपींना अटक करीत सोशल माध्यमांवरील 32 पोस्ट काढून टाकण्यात आलेली आहे. नागरिकांनी सोशल माध्यमांचा विचारपूर्वक जवाबदारीने वापर करावा, असे आवाहन राज्याच्या सायबर पोलिसांकडून करण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details