महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

FIR against Actor Sahil Khan : जीममध्ये महिलेला धमकावणे पडले महागात; अभिनेता साहिल खानवर गुन्हा दाखल - अभिनेता साहिल खान अडचणीत सापडला

मुंबई पोलिसांनी बॉलीवूड अभिनेता साहिल खान आणि एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 43 वर्षीय महिलेला धमकावल्याबद्दल आणि सोशल मीडियावर तिची बदनामीकारक पोस्ट अपलोड केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे.

FIR against Actor Sahil Khan
FIR against Actor Sahil Khan

By

Published : Apr 19, 2023, 8:28 PM IST

Updated : Apr 19, 2023, 8:54 PM IST

मुंबई - अभिनेता साहिल खान अडचणीत सापडला आहे. एका महिलेवर अश्लिल कमेंट करणे तसेच सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या अभिनेत्यावर महिलेला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. सध्या पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

महिलेने अभिनेत्यावर केला आरोप : मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या ओशिवरा पोलिस स्टेशनमध्ये अभिनेत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ओशिवरा उपनगरातील रहिवासी असलेल्या तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, त्याचे फेब्रुवारी २०२३ मध्ये एका जिममध्ये पैशावरून एका महिलेशी भांडण झाले होते. आरोपी महिला, साहिल खान यांनी फिर्यादीला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली होती. मंगळवारी दाखल करण्यात आलेल्या गुन्हाचा दाखला देत अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी जोडप्याने तक्रारदार, तिच्या कुटुंबीयांच्या विरोधात सोशल मीडियावर अपमानास्पद पोस्ट देखील अपलोड केल्या होत्या, त्यानंतर ओशिवरा येथील महिलेच्या तक्रारीवर भारतीय दंड संहितेच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पतीसोबत प्रेमसंबंध : आरोपी महिलेचे फिर्यादीच्या पतीसोबत प्रेमसंबंध होते अशीही माहिती पोलिंसांनी दिली आहे. तिच्या विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल केला होता. साहिल खान आत्तापर्यंत अनेक हिंदी चित्रपटांमध्ये दिसला आहे. स्टाइल, एक्सक्यूज मी, अलादीन आणि रामा: द सेव्हिअर हे त्यांचे प्रमुख चित्रपट आहेत. सध्या हा अभिनेता बराच काळ अभिनय जगतापासून दूर असून त्याचा व्यवसाय सांभाळत आहे.

खानवर कट रचल्याप्रकरणी गुन्हा : त्याच वर्षी, जानेवारी 2023 मध्ये मुंबईतील एका जोडप्याबाबत साहिल खानवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये साहिल खानवर कट रचल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला होता. यानंतर, माजी मिस्टर इंडिया स्पर्धेतील विजेत्याने दावा केला की आरोपी जोडपे, सोनिया अहमद (30) करणकुमार धीर (34), यांनी ओशिवरा येथील त्यांच्या स्टोअरमधून 52 हजार रुपये किमतीचे प्रोटीन सप्लिमेंट खरेदी केले होते. परंतु पेमेंट करण्यात चूक झाली होती. एवढेच नाही तर साहिल खानने आरोप केला होता की, या जोडप्याने त्यांचे फोटोशॉप केलेले अश्लील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते.

हेही वाचा - Dharashiv Suicide News : धक्कादायक! महिलेची तीन अल्पवयीन मुलांसह आत्महत्या; नवऱ्यासोबत भांडणाचा वाद?

Last Updated : Apr 19, 2023, 8:54 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details