मुंबईFine On Railway Hawkers : एप्रिल ते नोव्हेंबर 2023 या कालावधीत भारतीय रेल्वे कायद्याच्या कलम 144 अंतर्गत 24,339 फेरीवाल्यांवर गुन्हे नोंदवले (Action against hawkers) असून 24,334 फेरीवाल्यांना अटक करण्यात आली आहे. तसंच या फेरीवाल्यांकडून 3.05 कोटी रुपये एवढा दंड वसूल करण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या, रेल्वे सुरक्षा बलाच्या फेरीवाला विरोधी पथकाने अनधिकृत फेरीवाले आणि रेल्वेच्या परिसरात (Railway Protection Force) अतिक्रमण करणाऱ्या विनापरवाना फेरीवाल्यांविरुध्द अत्यंत यशस्वी मोहीम राबवली असल्याचं मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवराज मानसपुरे यांनी सांगितलं.
कुठे किती दंड वसूल?मध्य रेल्वेनं राज्यातील मुंबई, भुसावळ, नागपूर, पुणे आणि सोलापूर या विभागात फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई केली आहे. एकट्या मुंबई विभागात 9394 गुन्ह्यांची नोंद झाली असून 9393 जणांना अटक करून एकूण 1.02 कोटी रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे. भुसावळ विभागांमध्ये 7206 गुन्हे दाखल असून 7205 फेरीवाल्यांना अटक करण्यात आली आहे. तर 1.29 कोटी रुपयाचा दंड वसूल करण्यात आला. नागपूर विभागात 3181 गुन्हे दाखल करण्यात आले आणि 3179 जणांना अटक करण्यात आली असून 1 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.