महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईतील रेल्वे स्थानकांवर विनामास्क प्रवेश केल्यास 200 रुपये दंड - fine for entering railway stations without mask news

कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनातर्फे विविध उपाय योजना करण्यात येत आहे. आता रेल्वे स्थानकांवरही विनामास्क फिरणाऱ्यांवर 200 रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.

fine of two hundred rupees for entering railway stations without a mask in Mumbai
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर विनामास्क प्रवेश केल्यास 200 रुपये दंड

By

Published : Feb 23, 2021, 1:42 PM IST

मुंबई - आता रेल्वेस्थानकात विनामास्क आढळल्यास 200 रुपये दंड आकारण्यात येणार आहे. बोरवली स्थानकामध्ये या मोहिमेची सुरुवात झाली असून पोलीस अधिकारी विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर व रेल्वे प्रवाशांवर कारवाई करताना दिसत आहेत.

प्रतिक्रिया

विनामास्क फिरणाऱ्यांवर 200 रुपयांचा दंड -

मुंबईतील गर्दीचे ठिकाण असलेल्यापैकी एक म्हणजे रेल्वे स्थानक आहे. या रेल्वे स्थानकांवर नेहमीच मोठ्या प्रमाणात गर्दी असते. कोरोना काळात रेल्वे प्रवाशांची संख्या कमी झाली होती. परंतु आदा पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. तसेच रेल्वे प्रवाशीसुद्धा स्थानकांवर विनामास्क फिरताना आढळत आहे. त्यांमुळे कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनातर्फे विविध उपाय योजना करण्यात येत आहे. आता रेल्वे स्थानकांवरही विनामास्क फिरणाऱ्यांवर 200 रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.

हेही वाचा - नियम डावलणे पडले महागात! धनंजय महाडिक यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details