मुंबई -नवी मुंबई मेट्रो प्रकल्पासाठी ( Metro Project ) सिडकोला आयसीआयसीआय बॅंकेकडून ५०० कोटींचे अर्थसहाय्य ( Metro project financing from ICICI Bank ) होणार आहे. यामुळे मेट्रोच्या कामांना गती येणार असून उर्वरित कामे नियोजित वेळेत पूर्ण होऊन लवकरच या मार्गावर प्रवासी वाहतूक सुरु होणार आहे. यानिमित्ताने नवी मुंबई मेट्रो ( Navi Mumbai Metro Project ) अंतिम टप्प्यात आली असल्याची माहिती असल्याचे सिडकोचे ( CIDCO in Navi Mumbai ) व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी दिली
५ स्थानके झाली सुसज्ज -आयसीआयसीआय बॅंकेकडून मंजूर करण्यात आलेल्या पतपुरवठ्यामुळे एकप्रकारे सिडकोच्या प्रकल्पांच्या विश्वासार्हतेवर मोहोर उमटविण्यात आली असल्याचे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी सांगितले आहे. सिडको उभारत असलेल्या मेट्रोचा बेलापूर ते पेंधर हा अकरा किमी लांबीचा, ११ स्थानके असणारा मार्ग आहे. या मार्गावरील व्हायडक्टचे काम पूर्ण झाले असून ११ पैकी ५ स्थानके प्रवासी वाहतुकीकरिता सुसज्ज झाली आहेत. या मार्गाकरिता सीएमआरएससह सर्व महत्त्वाच्या परवानग्या प्राप्त झाल्या आहेत. उर्वरित ६ स्थानकांचे काम वेगाने सुरू झाले असून संपूर्ण मार्गावर लवकरच प्रवासी वाहतूक सुरू होणे अपेक्षित आहे.