मुंबईFinancial Fraud In Mumbai:टेलिग्राम टाक्स पूर्ण करण्याच्या नावाखाली सायबर गुन्हेगारांनी इंजिनियर असलेल्या 31 वर्षीय बिलाल अहमद मोहम्मद याकूब याला गंडा घातला आहे. बिलाल याकूब हा साकीनाका येथील रामदुलार यादव चाळीत राहतो. 18 ऑक्टोबरला सकाळी नऊ वाजताच्या सुमारास अंधेरी पश्चिम येथील ओबेराय स्काय गार्डन येथे कामावर असताना बिलाल यांना व्हाट्सअप वर मेसेज प्राप्त झाला की ''YouTube रियल एडवेंचर चॅनल सबस्क्राईब कीजिए, आपको पचास रुपये मिलेगा'' तेव्हा सांगितल्याप्रमाणे चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर बिलाल याला पन्नास रुपये त्याच्या बँक खात्यात जमा झाले. (Online financial fraud)
अशाप्रकारे अकाऊंटमध्ये रुपये जमा झाले:त्यापूर्वी पन्नास रुपये जमा करण्यासाठी बिलाल यांच्या मोबाईलवर टेलिग्राम लिंक पाठवण्यात आली होती. ही लिंक ओपन करण्यास सांगितले आणि प्रत्येक चैनलवर पन्नास रुपये मिळेल अशी बतावणी करण्यात आली होती. टेलिग्रामवर पाठवलेली लिंक ओपन करून चॅनल सबस्क्राईब केले. त्यानंतर बिलाल यांच्या अकाउंटमध्ये 150 रुपये जमा झाले. त्यानंतर टेलिग्रामवर एक लिंक पाठवून लिंक मधील व्हिडिओला सबस्क्राईब केल्यास 750 रुपये मिळतील असे आमिष बिलाल यांना दाखवण्यात आले. त्यानंतर बिलाल यांनी लिंक ओपन केली असता व्हिडिओ लाईक केल्यानंतर 750 रुपये त्याच्या बँक खात्यात जमा झाले. त्यावेळी टेलिग्राम टास्क देऊन बिलाल यांना दोन हजार रुपये जमा केल्यास 2800 रुपये मिळतील असे सांगण्यात आले. बिलाल यांनी टेलिग्राम टाक्स पूर्ण केल्यानंतर त्यांच्या अकाउंटवर 2800 रुपये जमा झाले.