मुंबईFinancial Fraud:14 जूनला दुपारी 3.53 ते 6.30 वाजताच्या कालावधीत अज्ञात इसमाने सारस्वत बँकेस ई-मेल व मोबाईलद्वारे संपर्क करून त्यांचे ग्राहक असल्याचे भासविले. यानंतर १७ लाख ९६ हजार ५६5 रुपये हस्तांतरीत करण्यास बनावटीकरणाद्वारे भाग पाडले. या गुन्ह्यात आरोपीने बँकेस त्यांच्या ग्राहकांच्या नावाने संपर्क करून तात्काळ बँक व्यवहार करावयाचा आहे असे सांगितले. त्याकरिता बनावट ई-मेलद्वारे बँक खाते पुरवून बँक खात्यात रक्कम हस्तांतरीत करण्यास भाग पाडले. 14 जूनला आरोपींनी अश्याच प्रकारे सारस्वत बँकेच्या मुंबईतील अंधेरी व दादर बँकेस संपर्क करून बनावटीकरणाद्वारे फसवणूक केल्याने पश्चिम विभाग सायबर पोलीस ठाणे, बीकेसी व मध्य विभाग सायबर पोलीस ठाणे, वरळी येथे दोन गुन्हे नोंद करण्यात आले. (Cyber Thieves Arrested )
बिहार, राजस्थान, यूपीतून गुन्हे:गुन्ह्याचा तपास सुरू करून बँक खाती व मोबाईल क्रमांकाविषयी माहिती प्राप्त करण्यात आली. तांत्रिक व पारंपरिक तपासातून गुन्ह्यात आंतरराज्यीय टोळी सक्रिय असल्याचे दिसून आले. तसेच गुन्ह्यातील आरोपींनी बिहार, राजस्थान व उत्तरप्रदेश या राज्यातून गुन्हे केल्याचे उघडकीस आले. त्यामुळे पश्चिम विभाग सायबर पोलीस ठाण्याचे पथक उत्तरप्रदेश व बिहार राज्यात रवाना केले गेले. कुंदन ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सारस्वत बँकेच्या खात्यातून संशयित उमेश गुप्ता याच्या राजस्थान येथील बँक खात्यात रक्कम हस्तांतरीत झाल्याने व सद्यस्थितीत हा आरोपी उत्तर प्रदेशातील देवरिया येथे असल्याचे दिसून आले. भटनी देवरिया, उत्तदप्रदेश येथे पोलीस पथक पाठवून स्थानिक भटनी पोलीसांच्या मदतीने आरोपी उमेश गुप्ता यास अटक करण्यात आली.