मुंबई -भिन्न विचारांचे पक्ष एकत्र आले आहेत. त्यामुळे प्रश्न निर्माण होतील. त्यामधून मार्ग देखील निघतील, असे जयंत पाटील म्हणाले. काँग्रेस पक्षातर्फे घाटकोपर पूर्वच्या आचार्य अत्रे मैदानात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित राष्ट्रवादी चषक क्रिकेट आर्म मॅचचे आयोजन करण्यात आले होते. या सामन्यांचे उद्घाटन राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष आणि राज्याचे अर्थमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. खासदार संजय राऊत यांनी राहुल गांधींच्या सावरकरांच्याबाबतच्या ट्विटवर ट्विट करीत उत्तर दिले. याबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी हे उत्तर दिले.
हेही वाचा - मुख्यमंत्री सहायता निधीला गती मिळाल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा
राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका अधिक होती. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पक्षाच्यावतीने सत्ता स्थापनेसाठी अधिक सामोरे येत होते. आता राज्यात सरकार स्थापन झाले असून यात जयंत पाटील हे कॅबिनेट मंत्री म्हणून सत्तेत चांगली बॅटींग करत आहेत. अशीच बॅटींग त्यांनी आज घाटकोपर येथे आयोजित राष्ट्रवादी चषक क्रिकेट मॅचच्या उद्घाटना वेळी केली. स्वतः मैदानात उतरून बराच वेळ बॅटींग करत ते चेंडू सर्व दिशेला टोलावत होते. यावेळी खूप दिवसाने क्रिकेट खेळलो मजा आली, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
हेही वाचा -रस्ते घोटाळ्यातील कंत्राटदारांवर उधळपट्टी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा - राखी जाधव
यावेळी रणजित सावरकर आणि संजय राऊत यांच्या ट्विट वर प्रतिक्रिया दिली. यावर पाटील म्हणाले कोणी काही मागणी केली तर ते करण्याची आवश्यकता नाही. शिवसेना आपली भूमिका योग्य पद्धतीने घेईल. असे मत भिन्नतेचे प्रश्न येणार , त्यातून मार्ग काढायचा असतो नक्की मार्ग निघेल, दोन भिन्न विचारांचे पक्ष एकत्र आले आहेत. तर असे प्रश्न तयार होतीलच, मतभेदाचे मुद्दे येणार, हळूहळू एकमेकांचे गैरसमज-समज दूर होतील असे ते या वेळी म्हणाले.