मुंबई - अखेर विधानपरिषदेच्या 9 जागांची निवडणूक बिनविरोध झाली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. यामध्ये १३ पैकी ४ उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्रे मागे घेतल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह ९ उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली.
विधानसभा सदस्यांद्वारे निवडून द्यावयाच्या विधानपरिषदेच्या एकूण ९ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली होती. त्यासाठी दाखल झालेल्या १४ उमेदवारांच्या नामनिर्देशनपत्रांपैकी एका उमेदवाराचे नामनिर्देशनपत्र अवैध ठरले होते. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा आजचा अखेरचा दिवस होता. १३ उमेदवारांपैकी डॉ. अजित माधवराव गोपछडे (भाजप), संदीप सुरेश लेले (भाजप ), किरण जगन्नाथ पावसकर (राष्ट्रवादी काँग्रेस), शिवाजीराव यशवंत गर्जे (राष्ट्रवादी काँग्रेस) या 4 उमेदवारांनी आपले नामनिर्देशनपत्र मागे घेतले.
लॉकडाऊनच्या बिकट काळातही या निवडणुकीदरम्यान सर्वपक्षीय राजकारण करण्यात आले. काँग्रेसने 2 उमेदवारी अर्ज दाखल केल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज असल्याचे सांगितले जात होते. बिनविरोध निवडणूक होत नसल्यास मी निवडणूक लढवणार नाही अशी त्यांनी भूमिका घेतली होती. भाजपमध्ये अनेक प्रस्थापितांना नाकारण्यात आल्याने निवडणूक अर्ज भरेपर्यंत दिग्गज नेत्यांची खदखद सुरू होती. दिग्गज नेत्यांना नाकारल्याने भविष्यात देखील भाजपपुढे डोकेदुखी निर्माण झाली आहे.
बिनविरोध निवडूण आलेले विधानपरिषद सदस्य
1) गोपीचंद कुंडलिक पडळकर (भाजप),
2) प्रवीण प्रभाकरराव दटके (भाजप)