मुंबई :निवडणूक आयोगामार्फत मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण व प्रमाणीकरण दुबार नोंदणीच्या त्रुटी दूर करणे. सुधारणा मतदार यादी करून नऊ नोव्हेंबर 2022 रोजी एकत्रित प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात (Final voter lists ready) आली होती. या प्रारूप मतदार यादीच्या प्रसिद्धीनंतर नागरिकांकडून दावे व हरकती स्वीकारण्यात आल्या. या सर्व दावे आणि हरकती यांचा निकाल 26 डिसेंबर 2022 पर्यंत लावण्यात आला. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने आज अंतिम मतदार यादी संपूर्ण राज्यभरात प्रसिद्ध केल्याची माहिती निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे (Shrikant Deshpande) यांनी दिली.
शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते :विशेष संक्षिप्त पुनरीक्षणाच्या कालावधीत युवा मतदारांनी तसेच दिव्यांग महिला देहविक्री करणाऱ्या महिला तृतीयपंथीय व्यक्ती आणि विमुक्त भटक्या जमातीमधील पात्र व्यक्तींनी मोठ्या प्रमाणात नोंदणी करावी, याकरिता विषय शिबिरांचे आयोजन राज्य सरकार तर्फे करण्यात आले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याचही त्यांनी सांगितले. भारत निवडणूक आयोगाने राज्यातील विशेषत: असुरक्षित आदिवासी गट प्रवर्गातील पात्र व्यक्तींचे 100% नोंदणीकरण करण्याबाबत (100 percent inclusion of vulnerable tribals too) निर्देश दिले होते. त्याप्रमाणे शंभर टक्के नोंदणी केल्याबाबत संबंधित जिल्ह्यांनी प्रमाणित केले असल्याचेही देशपांडे यांनी यावेळी सांगितले.