महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यपालांसंदर्भात बदनामीकारक वृत्त प्रसारित केल्याप्रकरणी पोलीसात तक्रार दाखल - bhagatsing koshari news

काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी एका मॉडेल अभिनेत्रीसाठी विशेष पासची व्यवस्था करून देऊन देहरादूनपर्यंत प्रवास करण्यास मदत केल्याची बातमी काहींनी प्रसिद्ध केली होती. याप्रकरणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून मुंबई पोलिसांच्या सायबर सेल विभागाकडे तक्रार नोंदविण्यात आली आहे.

Bhagat Singh Koshyari
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

By

Published : May 14, 2020, 8:33 PM IST

मुंबई - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून मुंबई पोलिसांच्या सायबर सेल विभागाकडे तक्रार नोंदविण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी एका मॉडेल अभिनेत्रीसाठी विशेष पासची व्यवस्था करून देऊन महाराष्ट्रातून दिल्लीमार्गे देहरादून येथे प्रवास करण्यास मदत केल्याची बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, राज्यपालांकडून ह्या गोष्टीचे खंडन करण्यात आले आहे. दरम्यान या खोटे व बदनामीकारक वृत्त वेबपोर्टलवर प्रसिद्ध केल्या प्रकरणी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, येथील मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे कक्ष येथे तक्रार नोंदविण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details