मुंबई- अतिरिक्त एफएसआय घोटाळा प्रकरणातील म्हाडाच्या संबंधित अधिकाऱ्यांविरोधात पाच दिवसात गुन्हा दाखल करा, असे मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेला निर्देश दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती संदिप शिंदे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणी सुनावणी झाली आहे.
अतिरिक्त एफएसआय घोटाळा प्रकरण; म्हाडाच्या संबंधित अधिकाऱ्यांवर ५ दिवसात गुन्हे दाखल करा - उच्च न्यायालय
पुनर्विकास योजना नियमानुसार बांधकाम व्यावसायिकांना अतिरिक्त एफएसआयच्या सदनिकांचा अतिरिक्त कोटा म्हाडाला देणे बंधनकारक होते. मात्र १२१ अधिक बांधकाम व्यावसायिकांनी म्हाडाला चुना लावल्याचे माहिती अधिकारातातून मिळालेल्या माहितीवरून समोर आले आहे.
या प्रकरणी तक्रारदार याचिकाकर्ते कमलाकर शेनॉय यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेतून त्यांनी १ लाख ३७ हजार ३३२ चौ. मी. म्हणजेच ३० लाख चौरस फूट क्षेत्रफळ म्हाडाला खासगी विकासकांकडून मिळालाच नाही, असा आरोप केला आहे. पुनर्विकास योजना नियमानुसार बांधकाम व्यावसायिकांना अतिरिक्त एफएसआयच्या सदनिकांचा अतिरिक्त कोटा म्हाडाला देणे बंधनकारक होते. मात्र १२१ अधिक बांधकाम व्यावसायिकांनी म्हाडाला चुना लावल्याचे माहिती अधिकारातातून मिळालेल्या माहितीवरून समोर आले आहे. म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी स्वतःच्या हितासाठी जबाबदारी नीट पार पाडलेली नाही, असही उच्च न्यायालयाने या निकालात म्हटले आहे.
हेही वाचा-काँग्रेसचा मास्टरप्लान ! त्यामुळे पक्ष राज्यात पुन्हा मारणार मुसंडी?