मुंबई:मागच्या दहा दिवसांपूर्वीच नवी मुंबईतील खारघर या ठिकाणी 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार सोहळा शासनाने आयोजित केला होता. या पुरस्कार सोहळ्याचे पुरस्कार मूर्ती आप्पासाहेब धर्माधिकारी होते. या सोहळ्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री शिंदे यांनी 20 लाख लोक येतील, अशी घोषणा कार्यक्रमाच्या तीन दिवस आधीच केली होती. कार्यक्रमाच्या दिवशी लाखो लोक खारघर येथील या पुरस्काराच्या निमित्ताने जमले; मात्र गर्दी, चेंगराचेंगरी आणि उष्माघाताने मृत पावले.
याचिकेत काय होते? कार्यक्रम स्थळी जनता जीव वाचवण्यासाठी वाट काढत होती, पाण्यासाठी तहानलेली होती, त्यांच्या शरीरातील पाणी कमी झाले होते आणि ते जीवाच्या आकांताने स्वतःला वाचवण्यासाठी सैरावैरा पळत होते. तेव्हा त्यांना वाचवायला शासनाने कोणतीही ठोस उपाययोजना केली नव्हती; मात्र त्याच वेळेला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री, पालकमंत्री आणि इतर अनेक मान्यवर हे जेवण करत होते; परंतु इकडे जनता भुकेने आणि पाण्याने व्याकूळ झाली होती. त्यामुळेच या शासनाला जनतेच्या जीविताची काही फिकर नाही, अशा आशयाची याचिका एडवोकेट नितीन सातपुते यांनी आज दाखल केली.
पूर्व नियोजन नव्हते:एडवोकेट नितीन सातपुते यांनी याबाबत 'ईटीवी भारत' सोबत संवाद साधताना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, खारघरमध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या सोहळ्यात केंद्रीय मंत्र्यासह राज्याचे अनेक मंत्री उपस्थित होते; मात्र लाखो जनता येणार हे माहीत असूनही कोणतेही पूर्व नियोजन नव्हते. लोकांच्या खाण्याची, पिण्याची, आरोग्याची काळजी शासनाने घेतली नाही. या ठिकाणी गर्दीमुळे चेंगराचेंगरी होऊन अनेक लोक मरण पावले. याला कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आप्पासाहेब धर्माधिकारी हे आहेत. त्यामुळे या सर्व मंडळींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली असल्याचे त्यांनी नमूद केले.
श्री सेवकांच्या आग्रहास्तव कार्यक्रम दुपारी: मागच्या रविवारी खारघर येथे पार पडलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्यादरम्यान उष्माघाताने मृत पावलेल्यांचा आकडा वाढत असल्याने सध्या विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका करण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणाची उच्च स्तरातून निवृत्त न्यायाधीश यांच्याकडून चौकशी करण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. सरकारने महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांची या प्रकरणी चौकशीसाठी नियुक्ती केल्याने विरोधक नाराज झाले आहेत.
हेही वाचा:Thackeray Group On Heatstroke : उष्माघात मृत्यू प्रकरणी राज्य सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; ठाकरे गटाची राज्यपालांकडे मागणी