मुंबई -एनसीबी माजी विभागीय अधिकारीसमीर वानखेडे जात प्रमाणपत्रावरुन सुरू झालेल्या वादानंतर मुंबई पोलिसांनी या संदर्भात काय कारवाई केली याकरिता राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे आज मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे (Mumbai CP Hemant Nagrale ) यांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. ( Nawab Malik and Sameer Wankhede Dispute ) हेमंत नगराळे यांच्याऐवजी मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीण पडवळ ( Additional CP Mumbai Pravin Padwal ) हे आज आयोगासमोर दिल्लीतील कार्यालयात उपस्थित झाले. याप्रकरणी दिल्ली राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगासमोर ( National Commission for Scheduled Castes ) सुनावणीवेळी आयोगाने नवाब मलिक यांच्यावर गुन्हा दाखल करून चौकशी करण्याचे दिलेत आदेश दिले आहेत.
आदेशात आणखी काय?
समीर वानखेडे यांच्याविरोधात राज्यात सुरू असलेल्या राज्य अनुसूचित जाती पडताळणी समितीकडे सुरू असलेल्या चौकशीची संपूर्ण माहिती राष्ट्रीय अनुसूचित जाती समितीसमोर देण्यात यावी तसेच त्यांच्यावर कुठलीही कारवाई करण्यात येऊ नये तसेच आयोगाकडे चौकशी प्रलंबित असेपर्यंत याप्रकरणी कोणताही अंतिम निर्णय घेऊ नये, असे निर्देशही आज देण्यात आले आहेत. याप्रकरणी पुढील सुनावणी 7 मार्च रोजी होणार आहे.