नवी मुंबई -नवी मुंबई परिसरातील तळोजा येथील परमशांती धाम वृद्धाश्रमात चक्क 56 वृद्धांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. तसेच दोन वृद्धांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या कोरोनाबाधित रुग्णांना त्रास झाला, तर त्यांना लगेच उपचार मिळावे व हॉस्पिटलमध्ये नेण्याची सोय व्हावी, म्हणून पनवेल महापालिकेच्या माध्यमातून कर्मचारी आश्रमाबाहेर नियुक्त करण्यात आले आहेत.
नवी मुंबई : तळोज्यातील परमशांतीधाम वृद्धाश्रमातील 56 वृद्ध कोरोना बाधित; दोघांचा मृत्यू - नवी मुंबई कोरोना बातम्या
परमशांती धाम वृद्धाश्रमात चक्क 56 वृद्धांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. तसेच दोन वृद्धांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसचे 14 वृद्धांवर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू असून 40 जणांचे वृद्धाश्रमातच विलगीकरण करण्यात आले आहे.
14 वृद्ध गंभीर अवस्थेत -
नवी मुंबई परिसरात असणाऱ्या तळोजा येथील या वृद्धाश्रमात एकूण 61 वृद्ध राहतात. या वृद्धापैकी 56 जणांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यामध्ये 16 जणांची स्थिती अत्यंत गंभीर झाली होती. यातील दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. उर्वरित 14 वृद्धांवर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहे. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. तसेच त्यातील 40 जणांचे वृद्धाश्रमात विलगीकरण करण्यात आले आहे.
हेही वाचा - अंध आईच्या हातून निसटला मुलगा, पडला रेल्वे ट्रॅकवर, पॉइंटमनने वाचवला जीव