मुंबई - अलिकडच्या काळात शेती क्षेत्रावर मोठे संकट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हळूहळू शेती करणाऱ्या लोकांची संख्या कमी होत आहे. भारत देशात जवळपास ६० कोटी लोकसंख्या प्रत्यक्ष-अप्रत्यरीत्या शेतीवर अवलंबून आहे. देशातील ५० टक्के शेतकऱ्यांना असे वाटते की, आपल्या पुढच्या पिढीने शेती करु नये. एकीकडे सरकार २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या गोष्टी करत आहे. मात्र, दुसरीकडे शेतकरी शेतीकडे पाठ फिरवत असल्याचे चित्र पाहायला मिळते आहे. गाव कनेक्शनच्या सर्वेतून ही माहिती समोर आली आहे.
'गाव कनेक्शन' या माध्यम समुहाने केलेल्या सर्वेत हे वास्तव समोर आले आहे. या संस्थने देशातील १९ राज्यांमध्ये १८ हजारांपेक्षा जास्त लोकांशी चर्चा करुन सर्वे तयार केला आहे. यामध्ये शेतकऱ्यांची शेती करण्याबाबत उदासिनता असल्याचे समोर आले आहे.
काय आहेत कारणे -
शेतीमालाला योग्य दर मिळत नाही
उत्पन्नाची अनिश्चतता
शेतीसाठी वाढत जाणारा खर्च
नैसर्गिक संकटे
जलसिंचनाच्या अपुऱ्या सुविधा
सरकारची धोरणे
४३.६ टक्के शेतकऱ्यांनी सांगितले की, आमच्या शेतीमालाला योग्य दर मिळत नाही, ही सर्वांत मोठी समस्या आहे. १९.८ टक्के सेतकऱ्यांनी सांगितले की, नैसर्गिक संकट ही मोठी समस्या आहे. १७ टक्के शेतकऱ्यांनी सांगितले की, शेतीसाठी वाढणारा खर्च
२०११ च्या जनगणनेनुसार १४.५ कोटी शेतकरी आहेत तर २७ कोटी लोकसंख्या ही शेती क्षेत्रातील कामगारांची आहे. तर ६० कोटी लोकसंख्या ही शेती किंवा त्यावर आधारीत आहे. शेती करणाऱ्या ५० टक्के लोकांना वाटते की, आपल्या पुढच्या पिढीने शेती करु नये.
सर्वेतून पुढे आलेली माहीती
४८ टक्के शेतकरी - पुढच्या पिढीने शेती करायला नको
३८ टक्के शेतकरी - काहीजण म्हणाले, शेती करायला हवी तर काहीजण म्हणाले शेती करायला नको
१३.९ टक्के - शेतकऱ्यांना वाटते मुलांनी शेती करावी मात्र, मुलांना शेती करावी वाटत नाही.