मुंबई :एसटी प्रवासात महिलांसाठी तिकिट दरात 50 टक्के सूट देण्याची राज्य सरकारने अर्थसंकप्लात घोषणा केली आहे. उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज 2023-24 या वर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर करीत आहेत. त्यावेळी त्यांनी महिलांना प्रवासात 50 टक्के सुट देण्याची घोषणा केली आहे. राज्य सरकारने आज 2023 साठीचा अर्थसंकल्प सादर केला आहे.
लेकलाडकी योजनेची घोषणा :कालच, महिला दिन साजरा करण्यात आला आहे. राष्ट्राची प्रगती ही महिला सक्षमीकरणाच्या आधारे ठरवली जाते. त्यासाठी आम्ही चौथे सर्वसमावेशक महिला धोरण घोषित करणार आहोत अशी घोषणा राज्यसरकारने केली आहे. मुलींच्या सक्षमीकरणाकरता लेकलाडकी ही नवीन योजना सुरू करण्यात येईल अशी देखील राज्य सराकारने घोषणा केली आहे.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना : महाराष्ट्रातील शेतकर्यांना आता १२००० रुपयांचा सन्माननिधी राज्य सकराने देणार असल्याची घोषणा केली आहे. प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य सरकारने भर घातली असुन प्रति शेतकरी, प्रतिवर्ष ६००० रु. राज्य सरकार देणार देणार असल्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. त्यामुळे राज्य सरकार तसेच केंद्राचे सहा हजार तसेच राज्यसरकाचे सहा हजार असे बारा हजार थेट शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहेत.