मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना मुंबई महापालिकेचे कर्मचारी, रुग्णांना व मुंबईकरांना अत्यावश्यक सेवा देत आहेत. अत्यावश्यक सेवा देताना पालिकेच्या कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी काहींचा मृत्यू झाला आहे. याची दखल घेत कोरोना झालेल्या रुग्णांवर पालिकेच्या रुग्णालयात मोफत उपचार करण्याचा तसेच मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसाला ५० लाख रुपये आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली आहे.
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या महापालिका कर्मचाऱ्यांच्या वारसाला ५० लाखांची मदत - mumbai municipality workers news
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी, त्यावर उपचार आणि विविध उपाययोजना राबवण्याचे काम करणाऱ्या पालिकेच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला सानुग्रहापोटी ५० लाख रुपयांचे सहाय्य देण्याची योजना लागू केली आहे. १ मार्च ते ३० सप्टेंबर या कालावधीसाठी ही योजना लागू राहणार आहे.
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी, त्यावर उपचार आणि विविध उपाययोजना राबवण्याचे काम करणाऱ्या पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना सानुग्रहापोटी ५० लाख रुपयांचे सहाय्य देण्याची योजना लागू केली आहे. १ मार्च ते ३० सप्टेंबर या कालावधीसाठी ही योजना लागू राहणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अशा प्रकारची योजना राबवणारी बृहन्मुंबई महानगरपालिका ही देशातील पहिलीच महानगरपालिका आहे. या योजनेमध्ये महापालिकेच्या निधीमधूनच सहाय्य देण्यात येणार आहे.
राज्य शासनाच्या वित्त विभागाने सानुग्रह सहाय्याची योजना राबविण्याचे निर्देश सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व राज्य शासकीय उपक्रम यांना २९ मे रोजी दिले. त्यानंतर अवघ्या १० दिवसांत ही योजना तयार करून ती लागू करण्यात आली आहे. पालिकेच्या कायम, कंत्राटी, बाह्य स्त्रोत, मानसेवी, रोजंदारी, तदर्थ तत्त्वावरील कर्मचाऱ्यांनाही याचा लाभ होणार असल्याचे महानगरपालिका प्रशासनाने जाहीर केले आहे.