मुंबई:मुंबई ते गोवा वंदे भारत ट्रेनचेउद्घाटन झाल्यानंतर येत्या सोमवारी ५ जूनपासून ही गाडी प्रवाशांच्या नियमित सेवेसाठी दाखल करण्यात येणार आहे. मुंबई-मडगाव गाडी आठवड्यातून मंगळवार वगळता सहा दिवस धावणार आहे.
८ डब्ब्याच्या या गाडीला ११ थांबे देण्यात आले आहे. मुंबई ते मडगाव हे ५८६ किमी अंतर ८ तासात पूर्ण केले जाणार आहे. आतापर्यंत या मार्गावर तेजस एक्सप्रेस सर्वात गतिमान गाडी आहे. तेजस ८ तास ५० मिनिटात हे अंतर पार करते. पण वंदे भारत तेजसपेक्षा अधिक गतिमान असल्याने त्याच्यामध्ये कमीत कमी १ तासाचा वेळ वाचणार आहे, असेही रेल्वे अधिकाऱ्याकडून सांगण्यात आलं आहे.
Vande Bharat Train : मुंबई ते गोवा दरम्यान धावणार राज्यातील पाचवी वंदे भारत ट्रेन, जाणून घ्या सविस्तर
मुंबई ते गोव्या यादरम्यान पहिली व राज्यातील पाचवी अशी हायस्पीड वंदे भारत ट्रेन ५ जून शनिवारपासून धावणार आहे. या अत्याधुनिक हायस्पीड वंदे भारत ट्रेनचे उद्घाटन स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतून व्हिडीओद्वारे करणार आहे. याप्रसंगी गोव्यामध्ये केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव तसेच गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे उपस्थित राहणार आहेत.
मागील महिन्यात चाचणी:आता राज्याला पाचवी वंदे भारत ट्रेन मिळाली आहे. पाचवी वंदे भारत ट्रेन मुंबई ते गोवा दरम्यान नियमित ५ जून सोमवार पासून धावणार आहे. मुंबई-मडगांव दरम्यान १६ मे रोजी मागच्या महिन्यात वंदे भारत ट्रेनची चाचणी घेण्यात आली होती. यशस्वी चाचणी आणि महत्त्वाच्या तांत्रिक बाबी तपासणीनंतर शेवटी शनिवार ३ जून रोजी मुंबई - गोवा वंदे भारत एक्सप्रेस प्रत्यक्ष रुळांवर धावण्यासाठी सज्ज झाली आहे. यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
राज्यात ५ वी वंदे भारत ट्रेन:प्रवाशांना सर्व सोईसुविधा, आरामदायी प्रवास, वेगवान गती, सुरक्षितता द्यावी या दृष्टीने भारतीय रेल्वे ने मेड इन इंडिया अंतर्गत देशभरात हायस्पीड वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात आल्या आहेत. वंदे भारत ट्रेन सुरू करुन भारतीय रेल्वेने जगभरात आपला वेगळा ठसा उमटवला. अशाचप्रकारे प्रत्येक राज्यातून वंदे भारत ट्रेन चालविण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची योजना आहे. महाराष्ट्र राज्यात सध्या चार वंदे भारत एक्सप्रेस धावत असून ही पाचवी वंदे भारत ट्रेन लाभली आहे.
अशी असणार वेळ:
- वंदे भारत ट्रेन छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून सकाळी ५.३५ वाजता सुटून ठाणे येथे ६.०५ वाजता पोहोचणार आहे.
- ही ट्रेन पनवेल येथे ६.४० वाजता, खेड येथे ८.४० वाजता, रत्नागिरी येथे १०.०० वाजता, तर मडगाव येथे दुपारी १.२५ वाजता पोहोचणार आहे.
- मडगाव येथून वंदे भारत दुपारी २.३५ वाजता सुटून परतीच्या प्रवासात रत्नागिरीतील ५.३५ वाजता पोहोचणार आहे.
- मुंबईत छत्रपती शिवाजी टर्मिनसला ही गाडी रात्री १०.३५ वाजता पोहोचणार आहे.
- आठवड्यात मंगळवार वगळता सर्व दिवस मुंबई-मडगाव वंदे भारत ट्रेन धावणार आहे.
- अद्याप काही सूचना येत असल्याने भारतीय रेल्वेकडून अंतिम वेळापत्रक जाहिर करण्यात आले नसले तरी हेच वेळापत्रक लागू होऊ शकते, अशी माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
तिकिटांचे दर कमी करावेत-मुंबईतून सुटणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांचा हवा तसा प्रतिसाद मिळत नाही आहे. याचे प्रमुख कारण या ट्रेनच्या तिकिटांचे दर आहेत. मुंबई - शिर्डी वंदे भारत ट्रेनला नाशिकपर्यंतच जास्त प्रतिसाद मिळतो, तर मुंबई - सोलापूर वंदे भारत ट्रेनला पुण्यापर्यंतच सर्वाधिक प्रतिसाद असल्याचे दिसून आले आहे. तर, दुसरीकडे या वंदे भारत एक्सप्रेसच्या तिकिटांचे दर कमी करावेत अशी मागणी प्रवासी रेल संघटनेकडून करण्यात आली आहे.
हेही वाचा-