मुंबई- राज्यात कोरोना विषाणूचा विळखा सर्वत्र पसरत असून रुग्णाची संख्याही वाढली असून यादरम्यान सर्वत्र खाजगी क्लिनिक अनेक दिवसांपासून बंद आहेत. रुग्णालय चालू ठेवण्याचे राज्य सरकारने आदेश दिले आहेत मात्र ते अद्याप चालू नसल्याने शासकीय व पालिका रुग्णालयावर सामान्य रुग्णाची गर्दी होत असल्याने कोरोना विषाणूच्या रुग्णांवरील उपचार करणाऱ्या रुग्णावर ताण पडतो आहे.काही दिवसांपूर्वी मुंबई महानगर पालिकेच्या महापौर व आयुक्तांनी एका बैठकीत मुंबईतील प्रत्येक विभागात ताप, खोकला, सर्दी, व इतर सामान्य रुग्णाच्या तपासणी करण्यासाठी फिव्हर क्लिनिक शिबिर आयोजन करून कोरोना सदृश्य लक्षणे असलेले रुग्ण तपासणीत आढल्यानंतर त्याना त्वरित उपचारासाठी रुग्णालयात हलवावे, अशा सूचना केल्या होत्या.
पवईत पालिकेचे फिव्हर क्लिनिक शिबीर संपन्न; कोरोना सदृश्य लक्षणे असणारा रुग्ण आढळला नाही - पवई
पवई येथे आज पालिका आरोग्य विभाग आणि बौद्ध विकास मंडळ यांचे संयुक्तरित्या फिव्हर क्लिनिक शिबीर सोशल डिस्टंन्सिंग पाळत रमाबाई आंबेडकर नगर येथे संपन्न परिसरातील जवळपास 150 नागरिकांची तपासणी करण्यात आली सुदैवाने यात एकही कोरोना सदृश्य लक्षण असलेला रुग्ण समोर आला नाही.
पवई परिसरात मागील काही दिवसांपूर्वी 3 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली होती. हे रुग्ण झोपडपट्टी विभागात आढल्याने पालिका आरोग्य विभागाने खबरदारी म्हणून या विभागात फिव्हर क्लिनिक शिबीर घेऊन सामान्य आजार असलेल्या 150 रुग्णांची तपासणी केली. नायर रुग्णालयाचे 4 डॉक्टर व त्यांच्या पथकाने केलेल्या तपासणीत सर्वसामान्य रुग्ण आढळून आले. शहरात असे प्रत्येक विभागात असे शिबीर संपन्न होणार असून यादरम्यान संशयित वाटणाऱ्या रुग्णाचे त्वरित नमुने घेवून त्यांना पुढील उपचारासाठी पालिकेच्या रुग्णालयात हलवले केले जाणार आहे.
तपासलेल्या सर्व नागरिकांमध्ये सामान्य सर्दी, ताप, खोकला अशीच लक्षणे होती असे उपस्थित डॉक्टरांनी यावेळी सांगितले. सध्या तरी पवई परिसरात समूह कोरोना विषाणूचा संसर्ग नाही. त्यामुळे नागरिकांनी आता जास्त काळजी घेण्याची गरज आहे. नागरिकांनी घरातच बसावे असे आवाहन बौद्ध विकास मंडळाचे अध्यक्ष भाऊ पंडागळे यांनी केले.