मुंबई -इंटरनॅशनल डॉटर्स डेच्या निमित्ताने दिवंगत अभिनेता इरफान खानची पत्नी सुतापा सिकदरने इरफानबाबतची एक आठवण सांगितली आहे. त्यांचे दुसरे मुल जन्माला येत असताना कशाप्रकारे दोघेही 'मुलगीच होऊ दे' ही आस लावून होते, आणि डॉक्टरकडून मुलगा झाल्याचे कळताच दोघेही कसे शांत झाले, याबाबत तिने फेसबुकवर लिहिले आहे.
सुतापा म्हणाली "मला आणि इरफानला एक मुलगी असावी, अशी तीव्र इच्छा होती. मात्र, माझ्या दुसऱ्या प्रसूतीनंतर डॉक्टरांनी 'अभिनंदन ! मुलगा झाला आहे,' असे सांगितले. तेव्हा, आम्ही दोघेही जरा शांत झालो. कारण दोघांनीही मुलगी व्हावी, यासाठी खूप प्रार्थना केली होती. एक मुलगी इरफानच्या पालकत्वापासून वंचित राहिल्याची खंत आज मलाजाणवते.”अशी भावना सुतापाने तिच्या फेसबुक अकाउंटवरुन शेअर केली आहे.