मुंबई Fathima Beevi Death : सर्वोच्च न्यायालयात नियुक्त झालेल्या पहिल्या महिला न्यायाधीश न्यायमूर्ती एम. फातिमा बीवी यांचे गुरुवारी (23 नोव्हेंबर) वयाच्या 96 व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या दीर्घ आणि उल्लेखनीय कारकिर्दीत, न्यायमूर्ती बीवी यांनी देशभरातील महिलांसाठी आदर्श घालून ठेवला. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदावरून निवृत्त झाल्यानंतर त्यांची तामिळनाडूच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली. यानंतर त्यांनी राजकीय क्षेत्रावरही आपली छाप सोडली. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर आपण फातिमा बीवी यांच्या जीवनप्रवासाविषयी जाणून घेऊया...
कोण आहे फातिमा बीवी?
फातिमा बीवी यांचं पूर्ण नाव मीरा साहिब फातिमा बीवी असं आहे. त्यांचा जन्म 30 एप्रिल 1927 रोजी केरळ येथील पतनमतिट्टा या गावात झाला. त्यांच्या वडिलांचं नाव मीर साहिब, तर आईचं नाव खदीजा बीबी आहे. बालपणापासूनच अभ्यासात हुशार असलेल्या फातिमा बीवी यांनी त्रिवेंद्रम येथून बी.एस.सी.ची आणि तिरुवनंतपुरम या शहरातून बी.एल. ही पदवी घेतली. 1950 मध्ये त्यांनी बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केलं. त्यावेळी या परीक्षेत अव्वल ठरणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या. याचवर्षी नोव्हेंबर महिन्यात त्यांनी वकील म्हणून नोंदणी केली अन् केरळच्या कनिष्ठ न्यायव्यवस्थेत त्यांची प्रॅक्टिस सुरू केली. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश होण्यापूर्वी फातिमा न्यायिक सेवांमध्ये कार्यरत होत्या. तसंच सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून निवृत्त झाल्यानंतर 25 जानेवारी 1997 रोजी त्यांची तामिळनाडूच्या राज्यलपालपदी नियुक्ती करण्यात आली.
राजीव गांधींच्या मारेकऱ्यांचा दयेचा अर्ज फेटाळला :1997 ते 2001 पर्यंत फातिमा बीवी या तामिळनाडू राज्याच्या राज्यपाल होत्या. यावेळी फातिमा बीवी यांनी देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या 4 मारेकऱ्यांनी फातिमा बीवी यांच्याकडे दयेचा अर्ज पाठवला होता. मात्र, फातिमा बीवी यांनी तो अर्ज फेटाळला अन् त्यानंतर राज्यपालपदाचा राजीनामा दिला.
हेही वाचा -
- सर्वोच्च न्यायालयानं मार्गदर्शी चिटफंड प्रकरणात विचारला 'हा' प्रश्न, याचिकाकर्त्यानं तत्काळ याचिका घेतली मागे
- SC On Electoral Bonds : इलेक्टोरल बाँड योजना वैध की अवैध, सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आजपासून सुरू
- MLA Disqualification Hearing : राष्ट्रवादीसह शिवसेनेच्या आमदार अपात्रतेप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी