महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Bombay Sessions Court : कौटूंबिक कलहातुन स्वत:च्या दोन मुलांची हत्या करणाऱ्या बापाला जन्मठेप ! - कौटूंबिक कलहातुन दोन मुलांची हत्या बापाला जन्मठेप

मुंबईतील घाटकोपर येथे 9 ऑक्टोबर 2019 रोजी वडिलांकडून स्वतःच्या दोन मुलांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टाने, वडील आरोपी चंद्रकांत अशोक मोहिते ला स्वतःच्या पोटच्या गोळ्यांची हत्या केल्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात घाटकोपर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुंबई सत्र न्यायालयातील न्यायाधीश ए. एस. जाधव यांनी ही शिक्षा सुनावली आहे.

Bombay Sessions Court
हत्या करणाऱ्या बापाला जन्मठेप

By

Published : Jan 14, 2023, 4:06 PM IST

मुंबई :आरोपी चंद्रकांत मोहिते यांनी म्हटले आहे की, आपल्या पश्चात पत्नी आपल्या मुलांचा सांभाळ करणार नाही, असे वाटल्याने मुलगी गौरवी वय 11 हिचे डोके रस्त्यावर आपटून, तर मुलगा प्रतीक (वय 7) याचा गळा आवळून खून केल्याप्रकरणी चंद्रकांत अशोक मोहिते याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस. जाधव यांनी ही शिक्षा दिली आहे. महामार्गावरील खंडाळा गावच्या हद्दीत 2019 साली ही घटना घडली आहे.


घरगुती वादातुन मुलांची हत्या : अशोक मोहिते हा मूळचा रासाटी पाटण येथील आहे. ड्रायव्हर म्हणून मुंबईला काम करायचा. पती पत्नीचा वाद सुरू होता. वादाला कंटाळून त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. मात्र आपल्या पाठीमागे मुलांना पत्नी सांभाळणार नाही, असे वाटल्यामुळे त्याने मुलांचा जीव घेतला. घरगुती वादातून मुलांची हत्या केली.


दोन्ही मुलांचा खुन केला : मुंबईतील घाटकोपर येथे 9 ऑक्टोबर 2019 साली ही घटना घडली होती. चंद्रकांत मोहिते हा दोन्ही मुलांना कारमध्ये घेऊन घाटकोपर मुंबई येथून नीरा नदीवरील रस्ता ओलांडून खंडाळा हद्दीतील कॅप्सूल कंपनी परिसरात आला. यावेळी त्याने दोन्ही मुलांचा खून केला. यानंतर दोन्ही मुलांचे मृतदेह कारच्या डिकीत ठेवून कारमधून निघाला होता. त्यावेळी मोहिते खंडाळा पोलिसांना सापडला.

जन्मठेप व 10 हजार रुपये दंड :पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर शिरवळ पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक उमेश हजारे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता सुरेखा क्षीरसागर, फिरोज शेख, गौरी लकडे यांनी बाजू मांडून युक्तिवाद केला. या खटल्यात साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. यावरून या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टाने, आरोपी अशोक मोहिते याला जन्मठेप व 10 हजार रुपये दंड, तो न भरल्यास 6 महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात घाटकोपर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुंबई सत्र न्यायालयातील न्यायाधीश ए. एस. जाधव यांनी ही शिक्षा सुनावली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details