मुंबई -पत्नीचा वर्षभरापूर्वी कोरोनाने मृत्यू झाल्याने नैराश्येतून 36 वर्षीय व्यक्तीने आपल्या 6 वर्षीय मुलीची हत्या करून आत्महत्या केली. ही घटना विलेपार्ले येथे घडली. जितेंद्र बेडकर, असे मृत व्यक्तीचे नाव असून अर्पिता, असे त्याच्या सहा वर्षीय मुलीचे नाव आहे.
हेही वाचा -18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण स्थगित करण्याचा विचार- राजेश टोपे
जितेंद्रच्या पत्नीचा जून 2020 मध्ये कोरोनाने मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याने डिसेंबर महिन्यात दुसरे लग्न केले होते. अर्पिता ही त्याच्या पहिल्या पत्नीपासून झालेली मुलगी होती. पत्नीच्या मृत्यूनंतर जितेंद्र मानसिक तणावात होता. विलेपार्ले येथे घर पाहण्यासाठी तो काल आला होता. त्यावेळी नैराश्येतून त्याने आधी मुलीची हत्या केली व नंतर स्वत: गळफास घेतला.