महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Father Slitting Son Throat : पोटच्या चिमुकल्या मुलाची गळा चिरून हत्या करणाऱ्या बापाला अटक - Father Slitting Son Throat

पत्नीसोबत झालेल्या भांडणातून (murder of son Quarrel with wife) संतापलेल्या पतीने स्वत:च्या चिमुकल्या मुलाची गळा चिरून हत्या (Murder of son slitting throat) केल्याची घटना मालाड मुंबई येथे घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पित्याला अटक (Father arrested for slitting his son throat) केली. पित्याचे नाव नंदन अधिकारी असून मृत मुलाचे नाव लक्ष आहे. Mumbai Crime, latest news from Mumbai, Father Slitting Son Throat

Father Slitting Son Throat
मृतक यश

By

Published : Nov 21, 2022, 12:53 PM IST

मुंबई : मालाडमध्ये शनिवारी १९ नोव्हेंबर रोजी सकाळी एका पित्याने आपल्या ६ वर्षांच्या मुलाचा गळा चिरून खून केल्याची (Murder of son slitting throat) धक्कादायक घटना घडली आहे. ४४ वर्षीय नंदन अधिकारी असे आरोपी पित्याचे नाव असून त्याने पत्नी सुनीतासोबत झालेल्या भांडणानंतर मुलगा लक्षची हत्या (murder of son Quarrel with wife) केली. याप्रकरणी आरोपी पित्याला पोलिसांनी अटक (Father arrested for slitting his son throat) केली. Mumbai Crime, latest news from Mumbai, Father Slitting Son Throat

आरोपीला अटक करून नेताना पोेलीस

आरोपीचा अंडेविक्रीचा व्यवसाय-मालाड पश्चिम येथील मालवणी परिसरात ही घटना घडली. मालवणी पोलिसांनी घटनास्थळी आरोपी नंदनला ताब्यात घेऊन लक्षचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. आरोपी पत्नी आणि दोन मुलांसह राहत होता. त्याच परिसरात नंदनचा अंड्यांचा व्यवसाय होता.

लक्षचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला-शनिवारी सकाळी आरोपीची पत्नी सुनीता आपल्या १३ वर्षाच्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी गेली. जेव्हा ती घरी परत आली तेव्हा तिला घराच्या फरशीवर लक्षचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. तिने मदतीसाठी आरडाओरडा केल्यावर शेजाऱ्यांनी तिच्या घराकडे धाव घेतली आणि नंतर मालवणी पोलिसांना माहिती दिली.

घरगुती वादाचे रुपांतर हत्येत-दोघा पती-पत्नीमध्ये अनेकदा किरकोळ वाद होत असल्याने त्यांच्यातील संबंध चांगले नसल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details