महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विलेपार्ले येथे कारचालकावर जीवघेणा हल्ला, जुहू पोलिसांनी सहा जणांना केली अटक - बाईकचालक स्लीप

Attack On Car Driver: दुचाकीस्वार स्वतःच बाईकवरून स्लिप झाला. मात्र, त्याने कारचालकावर टुक धरून वाद घातला. या वादाचे पर्यवसन कारचालकावरील जीवघेण्या हल्ल्यात झाले आहे. (Biker sleeps) याप्रकरणी 10 जानेवारीला जुहू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून नऊ जणांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (fatal assault) याप्रकरणी सहा आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती जुहू पोलीस ठाण्याचे सुनील जाधव यांनी दिली आहे.

Fatal Attack On Car Driver
कार चालकावर जीवघेणा हल्ला

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 11, 2024, 10:32 PM IST

मुंबईAttack On Car Driver:या सहा जणांना न्यायालयात हजर केले असता १५ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तक्रारदार तेजस हकानी (वय 45) हे इन्शुरन्स ब्रोकर म्हणून काम करतात. नऊ जानेवारीला रात्री दहा वाजताच्या सुमारास तेजस हकानी हे आपला मित्र मैत्री पटेल याला भेटण्यास कारने निघाले. त्यानंतर मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास कारने घरी परतत असताना तेजस यांच्या बिल्डिंगच्या गेट समोर कार बिल्डिंगच्या आतमध्ये प्रवेश करत असताना उजव्या बाजूने वळण घेतले. त्यावेळी आतमध्ये जात असताना एक अज्ञात इसम मोटर सायकल वरून तेजस यांच्या कारच्या पाठीमागे आला. पाऊस पडला असल्या कारणाने त्याची मोटर सायकल स्लिप झाली आणि तो स्वतःच खाली पडला. (argument with car driver)

बाईकचालकाने घातला वाद:दारूच्या नशेत असलेल्या मोटरसायकल स्वाराने कार चालक असलेल्या तेजस यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यावेळी तेजस यांनी तुमच्या मोटरसायकलचे काही नुकसान झाले असेल तर एक हजार रुपये देतो अजून काही असेल तर आपण सकाळी बोलू आता तो मद्यपान केलेला आहे, असं बाईकस्वाराला तेजस यांनी सांगितलं. मात्र, तरीदेखील बाईक स्वार कोणत्याही परिस्थितीत काहीही ऐकण्यास तयार नव्हता. गेटवर सुरू असलेली शिवीगाळ आणि भांडणाचा आवाज ऐकून हिमांशू शहा (वय 59) हे गेटवर आले. त्यांनी बाईकस्वाराला समजावून सांगितले. हिमांशु शहा यांनी आमचा मोबाईल नंबर घेऊन जा सकाळी बोलू असं त्याला सांगितलं; मात्र तो काहीही ऐकत नव्हता व दोघांनाही शिवीगाळ करत होता.

वॉचमनला मारहाण:त्यानंतर हिमांशू शहा यांनी पोलिसांना 100 क्रमांकावर मदतीसाठी फोन लावला. त्यानंतर मात्र बाईकस्वार भडकला आणि पुणे पोलिसांना बोलवता काय, आता मी माझ्या भाई लोकांना बोलावतो आणि तुम्हाला ठार मारून टाकतो अशी धमकी देऊ लागला. नंतर बाईकस्वाराने फोन लावून आठ ते नऊ जणांना घटनास्थळी बोलावले. मोटर सायकलवर बसून पाच मिनिटात आठ ते नऊ मित्र तेथे पोहोचले. त्यावेळी बाईकस्वाराचे नाव त्या मित्रांनी घेतल्यामुळे जिगर असल्याचे कळाले. जिगरचे मित्र आल्यानंतर वाद विकोपाला पोहोचला आणि त्यानंतर यश, आयुष, संकेत, विलास, सुमित यांना बिल्डिंगच्या मुख्य गेटने आत लाकडी बांबू आणि दगड घेऊन बोलावले. त्यावेळी इमारतीचे वॉचमन दुर्गा तिवारी आणि बलराम राजभर, सत्यदेव राजभर यांनी आपापसात भांडण करू नका. सकाळी काय ते पाहून घ्या, असं सांगितले. मात्र त्यांनी काहीही ऐकून घेतले नाही आणि हिमांशू शहा व तिन्ही वॉचमनला बांबूने, हाताने आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.

पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल:जिगर याने जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने हिमांशू शहा यांच्या डोक्यात दगड मारून गंभीर दुखापत केली. विलेपार्ले पश्चिम येथील कस्तुरी बिल्डिंगच्या आतमध्ये बाईक स्लिप झाल्यावर हा वाद पेटला असल्याची माहिती जुहू पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांनी दिली आहे. याप्रकरणी जिगर, यश, आयुष, संकेत, विलास, सुमित आणि तीन अज्ञात व्यक्तीं विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा:

  1. देशातील सर्वात मोठ्या 'अटल सेतू सागरी' प्रकल्पाचं होणार लोकार्पण; का आहे खास? जाणून घ्या सविस्तर
  2. कुठल्याही विषयाचं घोंगडं भिजत ठेवलं तर वास मारतोच; जरांगेंच्या आंदोलनावरून उदयनराजेंची प्रतिक्रिया
  3. विधानसभा अध्यक्षांना आर्टिकल १० चा विसर पडला, असदुद्दीन ओवेसी यांची टीका

ABOUT THE AUTHOR

...view details