मुंबई - मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना युनियन आणि महाव्यवस्थापक यांच्यात झालेल्या बैठकीत सातव्या वेतन आयोगाला तत्वत: मान्यता देण्यात आली. त्यानंतर बेस्ट महाव्यवस्थापक आणि कृती समितीचे शशांक राव यांच्यात बैठक झाली. या बैठकीत योग्य तोडगा निघाला नसल्याने गेले दोन दिवस सुरू असलेले उपोषण यापुढेही सुरूच राहणार असल्याची माहिती शशांक राव यांनी दिली आहे.
बेस्ट कर्मचाऱ्यांचे उपोषण सुरूच राहणार - शशांक राव - बेस्ट मुंबई
मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना युनियन आणि महाव्यवस्थापक यांच्यात झालेल्या बैठकीत सातव्या वेतन आयोगाला तत्वत: मान्यता देण्यात आली. त्यानंतर बेस्ट महाव्यवस्थापक आणि कृती समितीचे शशांक राव यांच्यात बैठक झाली. या बैठकीत योग्य तोडगा निघाला नसल्याने गेले दोन दिवस सुरू असलेले उपोषण यापुढेही सुरूच राहणार असल्याची माहिती शशांक राव यांनी दिली आहे.
बेस्ट कर्मचाऱ्यांचा वेतन करार, सातवा वेतन आयोग तागू करावे, बेस्टचा अर्थसंकल्प पालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करावा आदी मागण्यांसाठी जानेवारी महिन्यात नऊ दिवसाचा संप करण्यात आला होता. हा संप कोर्टाच्या आदेशानंतर मागे घेण्यात आला होता. मात्र त्यानंतरही कार्यवाही झाली नाही. बेस्ट उपक्रमाला एक संधी द्यावी म्हणून कृती समितीने धरणे आंदोलन सुरू केले. काल शिवसेना नेते अनिल परब आणि महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या उपस्थितीत पालिका आयुक्त व बेस्ट महाव्यवस्थापक यांची बैठक झाली. या बैठकीत दोन दिवसात सातवा वेतन आयोग लागू करावा अशी मागणी करण्यात आली. या मागणीनंतर जो पर्यंत करार होणार नाही तो पर्यंत उपोषण करू, असे कृती समितीचे शशांक राव यांनी जाहिर केले होते.
आज पुन्हा बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत मातोश्रीवर उद्धव ठाकरे, आमदार अनिल परब व महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत, प्रलंबित वेतन करार आणि सातव्या वेतन आयोगाप्रमाणे नवा वेतन करार करण्यास तत्वतः मंजुरी देण्यात आली आहे. सप्टेंबरच्या वेतननात ही पगारवाढ होणार आहे.