मुंबई- विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा सरकारविरोधी एल्गार पुकारण्याचा निर्धार केला आहे. राज्यातील शेतकरी संपूर्ण कर्जमाफीसाठी येत्या २ ऑक्टोबरपासून अर्थात गांधी जयंतीपासून पुन्हा आंदोलन सुरू करणार असल्याची माहिती सुकाणू समितीचे नेते डॉ. अजित नवले यांनी दिली.
राज्यात पुन्हा एकदा 'मी शेतकरी'च्या माध्यमातून बळीराजाचा एल्गार; गांधी जयंतीपासून आंदोलन - mee shetkari
मुंबईत गेल्या नोव्हेंबर महिन्यात धडकलेल्या विराट शेतकरी मोर्चाने सत्ताधारी हादरले होते. त्यानंतर आता विनाअट सरसकट संपूर्ण कर्जमुक्ती व शेती मालाला दीडपट हमीभाव या प्रमुख मागण्यांसाठी ऐन निवडणुकीच्या धामधुमीत शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा रणशिंग फुंकण्याचा निर्धार केला आहे.
मुंबईत गेल्या नोव्हेंबर महिन्यात धडकलेल्या विराट शेतकरी मोर्चाने सत्ताधारी हादरले होते. त्यानंतर आता विनाअट सरसकट संपूर्ण कर्जमुक्ती व शेती मालाला दीडपट हमीभाव या प्रमुख मागण्यांसाठी ऐन निवडणुकीच्या धामधुमीत शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा रणशिंग फुंकण्याचा निर्धार केला आहे. या आंदोलनांतर्गत प्रत्येक गावाच्या चावडीवर 'मी शेतकरी' या बॅनरखाली धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
गावात एखादा राजकीय पक्ष निवडणूक प्रचार सभा घेत असल्यास त्याच्याकडून शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत लेखी हमी घेतली जाणार आहे. शेतकऱ्यांच्या दोन्ही प्रमुख मागण्यांबाबत कायदा करण्याची हमी दिली तरच संबंधित पक्षाला गावात सभा घेण्यास परवानगी दिली जाईल, असेही निश्चित करण्यात आले आहे. अशी सभा झाल्यास 'मी शेतकरी' लिहिलेली टोपी घालून शेतकरी त्यात सहभागी होणार आहेत. याशिवाय राज्यभर शेतकरी परिषदा घेऊन कर्जमुक्ती व हमीभावाचा ठराव करून तो राज्यपालांना पाठवण्यात येईल, असेही सूकाणू समितीने सांगितले.