मुंबई :राज्यात प्रत्येक क्विंटल 3200 आहे. हा भाव किमान हमीभावापेक्षा जास्त आहे. गव्हासाठी शासनाने निश्चित केलेला हमीभावाचा दर 2130 रुपये आहे. त्यापेक्षा आता खुल्या बाजारात प्रति क्विंटल भाव जास्त आहे. मात्र जेव्हा जेव्हा खुल्या बाजारातील शेतकऱ्यांच्या वस्तू मालाला भाव हा हमीभावापेक्षा जास्त असतो. त्या वेळेलाच शासन दुर्लक्ष करते. काही धन दांडगे उत्पादक मालक आणि व्यापारी हे मात्र गव्हाचे किंवा इतर वस्तूंचे भाव पाडण्यास उत्सुक असतात, असे शेकतरी संघटनाचे म्हणणे आहे.
भाव किमान हमीभावापेक्षा कमी : तसेच पुढील महिन्यात म्हणजे मार्च 2023 आणि एप्रिल 2023 या काळामध्ये नवीन गहू येणार आहे. परंतु त्याच्या पूर्वीच केंद्र शासनाने 30 लाख टन गहू खुल्या बाजारात आणण्याचा धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे नक्की शेतकऱ्यांचे भाव पडणार, हे भाव किमान हमीभावाच्या पेक्षाही खाली जाणार. ते खाली गेल्यामुळे मोठे संकट उभे राहणार असल्याचे या संदर्भातील स्वतः शेतकरी असलेले आणि शेतीच्या संदर्भात अभ्यास करणारे अभ्यासक विजय जावंदिया यांनी विश्लेषण मांडले.
प्रचंड प्रमाणात खरेदी :एमएसपीच्या स्तरावर गव्हाचे भाव येणार नाही. ते जर आले नाही तर शेतकरी केंद्र शासनाला गहू विकणार नाही. जर लाखो शेतकऱ्यांनी केंद्र शासनाला गहू विकला नाही तर काय होणार? याची भीती पंतप्रधान नरेंद्र मोदी शासनाला आहे. म्हणजे जर केंद्र शासनाकडे गोदामात गहू यायचा असेल, तर त्यांना पुढील महिन्यात शेतकऱ्यांकडून गहू प्रचंड प्रमाणात खरेदी करावा लागेल. तो गहू जर खरेदी केला, तरच पाच किलो रेशनवरील गहू स्वस्तामध्ये देता येईल. त्याच्या आधारे 2024 च्या निवडणुकीपूर्वी हा निर्णय घेण्याचे श्रेय देखील केंद्र शासनाला घेता येईल. परंतु यामध्ये जर शेतकऱ्यांनी एमएसपीच्या स्तरावर गहू द्यायला नकार दिला, तर मोठा पेच निर्माण होणार ही लक्षात घेण्याजोगी अत्यंत महत्त्वाची बाब आहे, असे देखील विजय जावंधिया यांनी विशद केले.
शेतकऱ्यांना अपेक्षा : यावर उपाय म्हणून बाजारभावाच्या पार्श्वभूमीवर प्रती क्विंटल शेतकऱ्यांना गव्हाच्या संदर्भात बोनस देऊन शेतकऱ्यांचा गहू खरेदी करायला हवा. म्हणजेच रेशनवर देखील त्यांना गहू देता येईल. मात्र शेतकऱ्यांना देखील त्यातून काही प्रमाणात मोबदला मिळेल. थंडी चांगली पडल्यामुळे गव्हाच्या पिकाखालचे क्षेत्र वाढलेले आहे. गव्हाचे पीक देखील काहीच महाराष्ट्रामध्ये निश्चित वाढलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षा आहेत. परंतु त्यांच्या अपेक्षा धुळीस मिळू शकतात. याचे कारण गेल्या वर्षी युक्रेनचे युद्ध होते, म्हणून प्रचंड निर्यात झाली. यंदा युद्धही नाही तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर रुपयाचे अवमूल्यन देखील झालेला आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून आणि केंद्रशासनाने खुल्या बाजारात तीस लाख टन क्विंटल इतका गहू बाजारात आणल्यास भाव गडगडणार आहे. गहू उत्पादक शेतकरी भिकेला लागणार, असे शेतकऱ्याना वाटत आहे.