महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आझाद मैदानातील शेतकरी मोर्चाची ध्वजारोहणानंतर झाली सांगता - आझाद मैदान शेतकरी मोर्चा न्यूज

Azad Maidan Farmers Agitation
आझाद मैदान शेतकरी मोर्चा

By

Published : Jan 26, 2021, 9:14 AM IST

Updated : Jan 26, 2021, 10:19 AM IST

10:09 January 26

आझाद मैदानातील शेतकरी मोर्चाची झाली सांगता

आझाद मैदानातील शेतकरी मोर्चाची सांगता झाली

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईच्या आझाद मैदानात मोर्चा काढण्यात आला. काल (सोमवारी) या मोर्चात विविध पक्षांच्या मान्यवरांकडून शेतकऱयांना संबोधित करण्यात आले. आज प्रजासत्ताक दिनी झेंडावंदनकरून या मोर्चाची सांगता करण्यात आली आहे. झेंडावंदन प्रसंगी विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले आणि आमदार जयंत पाटील उपस्थित होते. मोर्चाची सांगता झाली असली तरी आंदोलन सुरूच राहणार आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान दिल्लीतील शेतकऱ्यांनी आवाज दिल्यास दिल्लीत जाऊन आंदोलनाला पाठिंबा देणार असल्याची माहिती शेतकरी नेते अजित नवले यांनी दिली.

09:55 January 26

७३ वर्षीय शेतकरी महिलेच्या हस्ते झाले ध्वजारोहण..

ध्वजारोहण करताना शेतकरी महिला

आज प्रजासत्ताक दिनानिमित्त आझाद मैदानात शेतकऱ्यांनी ध्वजारोहण कार्यक्रम साजरा केला. यावेळी एका ७३ वर्षीय शेतकरी महिलेच्या हस्ते तिरंगा फडकवण्यात आला.

09:00 January 26

आझाद मैदानातील शेतकरी मोर्चाची आज सांगता...

मुंबई - दिल्लीच्या सीमेवर गेल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अखिल भारतीय किसान मोर्चाने राज्यात आंदोलन पुकारले आहे. काल (सोमवार) या आंदोलनात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष भाई जगपात, सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, पी साईनाथ, अजित नवले, अशोक ढवळेंसह राज्यातील महत्त्वाचे शेतकरी नेते आणि मोठ्या संखेने शेतकरी सहभागी झाले होते. आज शेतकरी प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडावंदनकरून आपल्या मोर्चाची सांगता करणार आहेत. त्यावेळी सिनेअभिनेत्री व शिवसेना नेत्या उर्मिला मांतोंडकर उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

राज्यपालांचा निषेध, निवेदन टाकले फाडून -

सर्व पक्षीय मान्यवरांची भाषणे झाल्यावर शेतकऱ्यांचे निवेदन घेऊन मोर्चा आझाद मैदानातून राजभवनाकडे निघाला होता. पोलिसांनी हा मोर्चा मेट्रो सिनेमाजवळ अडवला. मोर्चामधील शिष्टमंडळ राजभवनावर निवेदन देण्यासाठी जाणार होते. मात्र, राज्यपाल गोव्याला असल्याने त्यांचा निषेध करत निवेदन न देण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यपालांना देण्यात येणारे निवेदन फाडून राज्यपालांच्या कृतीचा निषेध व्यक्त करण्यात आला. राज्यपालांना शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकरण्यास वेळ नसेल, तर त्यांनी कायमचे इतर राज्यात जाऊन स्थायिक व्हावे, असे शेतकरी नेते अजित नवले यांनी म्हटले.

राज्यपाल कंगनाला भेटतात, शेतकऱ्यांना नाही - शरद पवार

महाराष्ट्राच्या इतिहासात आपल्याला पहिल्यांदाच असे राज्यपाल भेटले आहेत. ज्यांना कंगनाला भेटायला वेळ आहे. मात्र, माझ्या शेतकऱ्याला भेटायला वेळ नाही, असा टोला लगावत शरद पवार यांनी शेतकऱ्यांना सामोरे जायला हवे होते. अशी बोचरी टीका राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर केली. राज्यपाल गोव्याला गेले असून शेतकऱ्यांना सामोरे जाण्याइतकी सभ्यता त्यांच्याकडे नाही. त्यांनी नैतिक जबाबदारी घ्यायला हवी होती, अशी टीकाही त्यांनी केली.

Last Updated : Jan 26, 2021, 10:19 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details