मुंबई- अवकाळी पावसामुळे बऱ्याच भागातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. काही भागात गारपीट झाल्यामुळे, कांदा, गहू, ज्वारी, हरभरा व भुईमुगाचे प्रचंड नुकसान झाले आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी आहे. नुकसान झालेल्या भागांचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सविस्तर माहिती आल्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे उत्तर कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिले आहे.
'गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभे आहे' - आवकाळी पाऊस
अवकाळी पावसामुळे बऱ्याच भागातील शेतकऱ्यांचे नुकसान झालेल्या भागांचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सविस्तर माहिती आल्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे कृषीमंत्री दादा भुसे म्हणाले.
कृषीमंत्री दादा भुसे
हवामान खात्याने वर्तविलेल्या, अंदाजानुसार गारपीट व अवकाळी पाऊस पडला आहे. तसेच यापुढे पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आम्ही खबरदारी घेत शेतकऱ्यांना सहकार्य करणार आहोत, असे दादा भुसे यांनी विधानभवना बाहेर माध्यमांशी बोलताना सांगितले.
हेही वाचा -'देश पातळीवरील जबाबदारी अन्य पक्षांसोबत; राज्यात मात्र महाविकास आघाडी'