महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शेतकरी नेते किशोर तिवारींची शिवसेनेच्या कृषी सल्लागार पदी नियुक्ती - shivsena chief uddhav thackery news

शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या कृषी सल्लागार पदी नियुक्ती केली आहे. आम्हाला कृषीसंबंधी आतापर्यंत कधी गरज लागली तर तिवारी मार्गदर्शन करत असल्याचे ठाकरे म्हणाले.

किशोर तिवारी , उद्धव ठाकरे

By

Published : Sep 20, 2019, 8:17 PM IST

Updated : Sep 20, 2019, 9:15 PM IST

मुंबई -विदर्भातील शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या कृषी सल्लागार पदी नियुक्ती केली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबद्दल आम्हाला काही कळत नाही, असा आरोप विरोधक आमच्यावर करतात. मात्र, कृषीसंबंधी काही गरज पडली तर किशोर तिवारी आम्हाला मार्गदर्शन करत असल्याचे ठाकरे म्हणाले.

शेतकरी नेते किशोर तिवारींची शिवसेनेच्या कृषी सल्लागार पदी नियुक्ती

हेही वाचा - राज्यात पुन्हा एकदा 'मी शेतकरी'च्या माध्यमातून बळीराजाचा एल्गार; गांधी जयंतीपासून आंदोलन

शिवसेना भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत तिवारी यांच्या नियुक्तीची घोषणा शिवसेना प्रमुखांनी केली. गेली अनेक वर्षे तिवारी हे शेतकरी चळवळ करत आहेत. मला ज्यावेळी शेतकरी प्रश्नांवर सल्ला पाहिजे असेल तर मी त्यांच्याशी बोलतो. जे मला कळत नाही त्यावर ते मार्गदर्शन करतात. ते पक्षात आल्यामुळे शिवसेनेच्या शेतकरी चळवळीला बळ मिळणार आहे असेही ठाकरे यांनी सांगितले.

हेही वाचा - मुंबईतील गॅस गळती संदर्भात आज महत्त्वपूर्ण बैठक

माझे नाव भारतीय जनता पक्षाबरोबर जोडले जाते. मात्र, मी भाजपचा सक्रिय सदस्य नव्हतो. परंतु, कोणत्याही योजना असतात त्यात त्रूटी असतात. उद्धव ठाकरे यांनी शेतकरी प्रश्नांवर सरकारच्या विरोधात जाऊन प्रश्न मांडले. माझे आणि ठाकरे यांचे २००४ पासून संबंध आहेत. विदर्भ ही त्यांच्या पाठीशी उभा राहील असे तिवारी यांनी सांगितले.

Last Updated : Sep 20, 2019, 9:15 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details