मुंबई - सातारा जिल्ह्यातील मिलिटरी अपशिंगे गावातील मोनाली तानाजी कंठे या तरुणीला एसटी चालकाच्या निष्काळजीपणामुळे पाय गमवावा लागला आहे. मोनालीला कायमच अपंगत्व आल्याने तिच्या घरच्यांनी तिला एसटी महामंडळात नोकरी देऊन तिचे पुनर्वसन करावे, अशी मागणी केली आहे.
हेही वाचा -
देवेंद्र फडणवींसाच्या भाग्यात 'हे' पद फारकाळ नाही.. भैय्याजी जोशींनी वर्तवले भविष्य
अकरावीमध्ये शिकणारी मोनाली नावाची तरुणी सातारा-कामेरी मार्गावर धावणाऱ्या बसमध्ये चढत असाताना, चालकाने निष्काळजीपणे गाडी चालवली. यात अनेकजण तोल जाऊन पडले. यावेळी मोनालीचा पाय चाकाखाली गेला. यानंतर एसटी महामंडळाने आपली चूक मान्य करुन तिच्या उपचारासाठी यशवंत रुग्णालयामध्ये अनामत रक्कम देखील भरले होते. परंतु, पुढील खर्चाचे पैसे द्यायला उशीर केल्यामुळे दवाखान्याने उपचार करणे बंद केले आणि त्यामुळे तिच्या पायाला गँगरिन झाल्याने तिचा पाय काढावा लागला आहे, असा आरोप मोनालीच्या पालकांनी केला आहे.