महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मागील सरकारने अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण दाबले, कुटुंबीयांचा थेट आरोप - अन्वय नाईक मुलगी आज्ञा नाईक पत्रकार परिषद न्यूज

सभागृहात विरोधी पक्षाने मनसुख हिरेन प्रकरण बाहेर काढल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी अन्वय नाईक प्रकरण आणि मोहन डेलकर प्रकरण बाहेर काढले. त्यामुळे हा संपूर्ण राजकीय वाद रंगत आहे का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. दरम्यान, अन्वय नाईक यांची मुलगी आज्ञा नाईक आणि पत्नी अक्षता नाईक यांनी पत्रकार परिषद घेत मागील सरकारने हे प्रकरण दाबल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच, मनसुख हिरेन प्रकरण आणि अन्वय नाईक प्रकरणात वेगवेगळा न्याय कसा, असा सवाल त्यांनी केला आहे.

Anvay Naik Suicide Case News
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण न्यूज

By

Published : Mar 11, 2021, 1:03 PM IST

Updated : Mar 11, 2021, 7:53 PM IST

मुंबई -काल विधानसभेमध्ये विरोधी पक्षाने मनसुख हिरेन प्रकरणासंदर्भात आवाज उठवला होता. त्या संदर्भात मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले एपीआय सचिन वाझे यांचे निलंबन करण्यात यावे, अशी मागणी ठेवली होती. त्यावर गृहमंत्र्यांनी सचिन वाझे यांना तत्काळ त्यांच्या पदावरून दूर करत आहे, अशी घोषणादेखील केली. त्यावर ती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात आम्ही एसआयटीची स्थापना करणार आहोत आणि एसआयटीद्वारे या प्रकरणाची चौकशी करणार आहोत, अशी माहितीदेखील या वेळेस गृहमंत्र्यांनी विधानसभेत दिली.


सभागृहात विरोधी पक्षाने मनसुख हिरेन प्रकरण बाहेर काढले असता सत्ताधाऱ्यांनी अन्वय नाईक प्रकरण आणि मोहन डेलकर प्रकरण ही दोन्ही प्रकरणे बाहेर काढली होती. त्यामुळे हा संपूर्ण राजकीय वाद रंगत आहे का, असा प्रश्नदेखील या निमित्ताने उपस्थित होत आहे.

हेही वाचा -मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी एटीएसने नोंदवला सचिन वझेंचा जवाब


मनसुख हिरेन प्रकरण आणि अन्वय नाईक प्रकरणात वेगवेगळा न्याय कसा?

या संपूर्ण अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे यांचा सीडीआर पुरावा काढला होता. त्यावरती आज अन्वय नाईक यांची मुलगी आज्ञा नाईक आणि त्यांची पत्नी अक्षता नाईक या दोघींनी पत्रकार परिषद घेऊन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला आहे की, तत्कालीन अन्वय नाईक प्रकरणात तुम्ही मुख्यमंत्री असताना आमच्या वडिलांनी आत्महत्या केली. त्यांची सुसाईड नोट असतानासुद्धा दोषींवर तुम्ही कारवाई करण्यासाठी टाळाटाळ केली. आता मनसुख हिरेन प्रकरणामध्ये वेगळा न्याय आणि आमच्या प्रकरणामध्ये वेगळा न्याय दिसत आहे. या सरकारने जर एसआयटीची स्थापना केली असेल, तर ती भूमिका अत्यंत योग्य आहे आणि या सरकारने घेतली आहे.

अर्णब गोस्वामीकडून आमच्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न

एसआयटीची स्थापना करायला सरकारला वेळ जरी लागला असला तरी, सरकारने घेतलेली ही भूमिका अत्यंत योग्य आहे. आमचा थेट आरोप आहे की, माझ्या बाबांच्या मृत्यूच्या वेळेस जे सरकार होते, ते युतीचे सरकार होते. तेच सरकार माझ्या बाबांच्या मृत्यूला जबाबदार आहे आणि अर्णब गोस्वामी हा आम्हाला सातत्याने वेगवेगळ्या माध्यमातून धमक्या देत आहे. तसेच, आमच्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु, आम्ही त्याच्या दबावाला बळी पडणार नाही आणि त्याला त्याच्या झालेल्या गुन्ह्याची आम्ही शिक्षा दिल्याशिवाय आम्ही स्वस्थदेखील बसणार नाही. याचा पाठपुरावा आम्ही मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना दोघांना सातत्याने करणार आहोत. वेळ आली तर आम्ही गृहमंत्री आणि मुख्यमंत्री या दोघांची भेटदेखील घेऊ, अशी प्रतिक्रिया अन्वय नाईक यांची मुलगी आज्ञा नाईक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

हेही वाचा -अंबानींना धमकी देणारा जैश-उल-हिंदचा ग्रुप तिहार जेलचा

Last Updated : Mar 11, 2021, 7:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details